किराणा बाजारदेखील दररोज सुरू असल्याने आज या ठिकाणीही गर्दी नव्हती. काही नागरिक बाजारात फळे आणि भाजीपाला खरेदी करण्यासाठी येत होते.
संचारबंदी असली तरी आज सकाळी बाजार समिती आवारातील भाजीपाला लिलावाच्या वेळी शेतकरी, खरेदीदार, विक्रेते अन् अडते यांची गर्दी होती. अशी परिस्थिती रोजच असते. त्यामुळे पूर्वीच्या संचारबंदीप्रमाणे भाजी मंडई बंद करून गावात फिरून विक्री करणे गरजेचे असल्याचे या ठिकाणी काही व्यापारी, नागरिक बोलत होते.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीदेखील काही दिवस बंद ठेवण्याची आवश्यकता असल्याचे काही व्यापाऱ्यांनी बोलून दाखविले. मात्र याबाबत काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बाधित रुग्ण आढळलेली गल्ली सील
नगरपालिकेच्या वतीने ज्या इमारतीमध्ये किंवा गल्लीत पाचपेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येतील तो भाग कंटेन्मेंट झोन करण्यास सुरुवात केली आहे. बांबू बांधून ती गल्ली सील करण्यात येत आहे, असे मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील यांनी सांगितले.
फोटो
१५बार्शी-बाजार समिती
ओळी.
संचारबंदी लागू झाल्यानंतर बार्शी बाजार समितीमधील ही स्थिती.