शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

सिमला मिरचीतून सहा महिन्यांत तब्बल दहा लाखांचे उत्पन्न  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 1:04 PM

कमी पाण्यात अन् वेळेत मिळवले जास्त उत्पन्न; जाधव यांचा सिमला मिरचीचा यशस्वी प्रयोग 

ठळक मुद्दे- पाण्याचा वापर कमी प्रमाणात करून शेतीचे उत्पादन वाढविले- आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतीत केले बदल- मजुरांवर मात करीत यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून साधले जास्तीचे उत्पादन

अंबादास वायदंडे सुस्ते : सध्या शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करण्याकडे वळला   आहे़ कमी पाण्यात, कमी खर्चात आणि कमी कालावधीत जास्त उत्पन्न मिळविण्यासाठी धडपड सुरू आहे़ फुलचिंचोली (ता़ पंढरपूर) येथील नागेश ज्ञानोबा जाधव यांनी शेडनेट उभारले आणि ते त्यांना फायदेशीर ठरले़ कारण या शेडनेटमधील सिमला मिरचीतून सहा महिन्यांत तब्बल दहा लाखांचे उत्पन्न   मिळाल्याचे ते सांगत होते़नागेश जाधव यांनी भाऊ संतोष जाधव यांना बरोबर घेऊन शेतकºयांच्या विहिरी फोडण्याचे काम करत होते. यातून त्यांनी फुलचिंचोली हद्दीत तीन एकर जमीन खरेदी केली. या शेतीत २०१४-१५ साली एका एकरात ५ लाख रुपये खर्चून शेडनेट उभारले़ तेव्हापासून दरवर्षी काकडी, सिमला मिरची अशी पिके घेत लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.

नागेश जाधव हे वडील ज्ञानोबा जाधव, भाऊ संतोष जाधव, पत्नी स्वाती जाधव, भावजयी सुलभा जाधव यांच्या सहकार्याने शेतात वेगवेगळे प्रयोग करीत आहेत़ शिवाय त्यासाठी योग्य व्यवस्थापनही करतो़ यावर्षी शेडनेटमध्ये मशागत केल्यानंतर पाच ट्रॉली शेणखत व रासायनिक खते टाकली़ पाच फूट अंतरावर बोद सोडून झाल्यानंतर ठिबक सिंचनद्वारे तीन तास पाणी देऊन ते भिजवून घेतले़ नंतर सव्वा फूट अंतरावर सिमला मिरची रोपांची लागवड केली. लागवडीपासून पाच दिवसांनी बुरशीनाशक फवारणी केली़ अशा पद्धतीने नियोजन केले़ केवळ दीड महिन्यांनंतर त्याचे उत्पादन सुरू झाल्याचे नागेश जाधव यांनी सांगितले.

सिमला मिरचीचे एकूण १३ टन उत्पादन निघाले असून, किलोस २२ ते ३२ रुपयांप्रमाणे दर मिळाला आहे. यापासून दोन महिन्यांत ३ लाख ५० हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे. पुढील काळात आणखी ७ लाख ५० हजार रुपये उत्पन्न निघणे अपेक्षित आहे, असे त्यांनी सांगितले.

शेतीत कष्ट केल्यास उत्पन्न मिळतेच- धनाजी जाधव हे शेतात वेगवेगळे प्रयोग घेऊन त्यापासून भरपूर उत्पन्न घेत होते़ त्यांच्याप्रमाणे आपणही शेती केली पाहिजे म्हणून एका एकरात शेडनेटची उभारणी केली. त्यामध्ये काकडी व सिमला मिरची यांसारखी पिके लावून कमी दिवसात, कमी पाण्यात व जास्त नफा मिळवून देणाºया पिकांचा प्रयोग केला. शेतीमध्ये प्रामाणिकपणे कष्ट केल्यास निश्चितच जास्त उत्पन्न मिळते, असे नागेश जाधव यांनी सांगितले़ 

 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarketबाजार