दरम्यान मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजय भोसले, कार्यकारी विश्वस्त अमोल भोसले यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी बहुजन शिव जन्मोत्सव युवक मंडळाचे संस्थापक सुरेशचंद्र सूर्यवंशी, रामचंद्र घाडगे, स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, श्री फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब निंबाळकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मनोज निकम, पोलीस निरीक्षक देवेंद्र राठोड, शहर शिवसेना प्रमुख योगेश पवार, प्रवीण देशमुख, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष प्रवीण घाडगे, शिवसेना शहर उपप्रमुख तेजस झुंजे व न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त संतोष भोसले उपस्थित होते.
दरम्यान अन्नछत्र मंडळाच्या परिसरातील शिवस्मारक, शिवसृष्टी, श्री स्वामी समर्थ वाटिका, आश्रयदाते कक्षातील छत्रपतींच्या पुतळ्यांचे पूजन हर्ष भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी कांदीवली येथील उमेश आग्रे, संदीप जोशी, प्रशांत पलांडे, गौरांग जानी, नितीन चव्हाण, भावेश पांचाळ, महिंद्र पवार, अनोज शिकलीगर उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यासाने शासनाचे सर्व ते नियम पाळत हा उत्सव साजरा केला.