नेमतवाडी गावाच्या दक्षिण बाजूला शेवतेला जाणार रस्ता आहे. या रस्त्यावरून प्रवास करणारे नेमतवाडी येथील अनेक शेतकरी आहेत. मागील अनेक वर्षांपासून या रस्त्याची पूर्ण दुरावस्था झाली आहे. शिवाय पावसाळ्याचा पहिलाच पाऊस झाल्याने रस्त्यावर गुडघाभर पाणी साठले आहे तर रस्ता चिखलमय बनला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
गावात येणे-जाणे तर सोडाच परंतु शेतातील शेतीमाल मार्केटला घेऊन जाणे अशक्य होतं आहे. अशी परिस्थिती असताना याकडे प्रशासनाकडून डोळेझाक केली जात आहे. रस्ता मुरुमीकरण त्वरित न केल्यास उपोषण करण्याचा इशारा सुधीर अमराळे, बंडू अमराळे, नितीन अमराळे, महादेव कोळी, संजय अमराळे, धनाजी साबळे, गोविंद अमराळे, धनाजी अमराळे यांनी दिला आहे.