वेळापूर : साहेब पैसे नाहीत, वीजबिल म्हणून शेतमाल स्वीकारा, असे म्हणत वेळापूर महावितरण कंपनीच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना भाजीपाला देत भाजपने अनोखे आंदोलन केले.
सध्या शेतीमध्ये जी पिके आहेत. त्या पिकांना दर नाही. पिकांवर रोग पडलाय. उसाला हुमनी व लोकरी मावा आहे. डाळिंब बागा तेल्या रोगाने उद्ध्वस्त झाल्या आहेत. मक्यावर अळी व मावाचा प्रादुर्भाव आहे. भाजीपाला मातीमोल दराने विकला जातोय. कोरोनामुळे दुधाला दर नाही. कोरोना व साथीच्या इतर आजारांनी शेतकरी हवालदिल झाला असून, शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही. वीजबिल भरण्याची इच्छा आहे, पण पैसे नाहीत. म्हणून ज्या पद्धतीने जुन्या काळात पैशांच्या ऐवजी वस्तूंमध्ये व्यवहार व्हायचे तसेच आमच्याकडे उपलब्ध असणारा शेतमाल घ्या. त्यातून वीज बिल स्वीकारा. पण, लोडशेडिंग बंद करून वीज पुरवठा सुरळीत करा, अशी मागणी के. के. पाटील यांनी केली.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सोपान नारनवर, ओबीसी मोर्चा माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वावरे, सरचिटणीस संजय देशमुख, उपाध्यक्ष लक्ष्मण माने, बलभीम जाधव, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष दादासाहेब खरात, किरण पाटील, जब्बार आतार, विनोद थिटे, अमर मगर उपस्थित होते.
.......
फोटो ओळी. महावितरणच्या अधिकाऱ्यांना भाजीपाला देऊन अनोखे आंदोलन करताना भाजपाचे के. के. पाटील, सोपान, नारनवर, बाळासाहेब वावरे, संजय देशमुख.
........
(फोटा २५वेळापूर)