प्रथम या महिलेने पोलिसांना विनवणी केली. साहेब माझा भाऊ खूप आजारी आहे. त्यांना अर्धांगवायू झाला आहे. सोलापूरला दवाखान्याला घेऊन जात आहोत, आम्हाला सोडा, अशी विनंती केली. मात्र, पोलिसांनी त्यांना दंड भरण्यास सांगितले. महिलेची भावाविषयी असणाऱ्या आत्मीयतेचे दर्शन या ठिकाणी घडले. चक्क ती महिला साहेबांसमोर, साहेब तुमच्या पाया पडते ओ, माझा भाऊ खूप आजारी आहे. त्यांना लवकर दवाखान्यात न्यावे लागेल... अशा शब्दांत पोलिसांना विनवणी केली. शेवटी गाडीत रुग्ण आहे का नाही, याची पोहेकॉ. जीवराज कासवीद यांनी खात्री केली. यावेळी गाडीत एक रुग्ण असल्याचे आढळून आले. या लोकांची रुग्णाविषयीची आत्मीयता पाहून वाहन सोडण्यात आले.
यावेळी पोलीस हेडकॉन्स्टेबल जीवराज कासविद, पोलीस पाटील नितीन उघडे, सरपंच पती नेताजी वाघमारे, पोलीस मित्र दत्तात्रय पवार उपस्थित होते.