शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अजित पवारांचा जयंत पाटलांना धक्का! सांगलीत 'घड्याळ' चिन्हावर दोन उमेदवार उतरवणार
2
सहा मतांनी आमदार... १००च्या आतील मतफरकाने आजवर १२ जणांनी जिंकली विधानसभा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांनी ११ नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवलं; होणार मोठी लढत
4
आजचे राशीभविष्य : स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल, धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल
5
शनी मार्गी: ७ राशींची दिवाळीनंतरही दिवाळी, व्यवसायात नफा; उधारी वसूल होईल, बँक बॅलन्स वाढेल!
6
पुण्यातील त्रिकुटाला दिली होती बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी; पैशांच्या वादातून नाकारले काम
7
सरकारी निर्णयांवर आयोगाचा असेल ‘वॉच’; मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती
8
विकास हवा, नको नुसता बोभाटा; नाही तर आहेच ‘नोटा’; गेल्यावेळी हा पर्याय होता दुसऱ्या स्थानी
9
फक्त विक्री आणि विक्री... शेअर बाजाराला कोणाची नजर लागली; कोरोनानंतर मोठी निराशा, काय आहे इशारा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : पाच वर्षांत आदित्य ठाकरेंच्या संपत्तीत ४ कोटींची वाढ
11
ते आले, उमेदवाराने अर्ज भरला, ते गेले; राज ठाकरे यांनी पुन्हा केला मनसैनिकांचा हिरमोड
12
आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांचे महायुतीविरुद्ध आंदोलन; प्रचार करणार की नाही?
13
मुंबईत काँग्रेसचे ४ अल्पसंख्याक उमेदवार; पहिल्या यादीत अस्लम शेख, अमीन पटेल आदींची नावे
14
मंगल प्रभात लोढा यांची संपत्ती ४३६ कोटी! पाच वर्षांत ठाकरे, आव्हाडांची संपत्ती कितीने वाढली?
15
बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार काका-पुतण्या लढत; गडचिरोलीत वडील विरुद्ध मुलगी
16
बडे नेते, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सर्वांनीच केले शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी साधला मुहूर्त
17
एलओसीजवळ दहशतवादी हल्ला, दाेन जवान शहीद; जम्मूत पुन्हा भ्याड कृत्य; दाेन हमालही ठार
18
महायुतीत २७८ जागांवर ठरले; आता १० जागांचाच तिढा! अमित शाहांसोबतच्या बैठकीत निर्णय
19
काँग्रेसने २५ विद्यमान आमदारांना पुन्हा दिली उमेदवारीची संधी; ४८ जणांची पहिली यादी जाहीर
20
घड्याळ वापरा, पण अटही पाळा; अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या कानपिचक्या

सोलापुरातील पदपथांवर बसलेल्या गरजूंचे तीन दिवसांपासून जेवणाविना हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 1:50 PM

सामाजिक संस्था, संघटनांचा उत्साह थंडावला; आशेने पाहताहेत कार्यकर्त्यांची वाट

ठळक मुद्देरेल्वे स्टेशन परिसरात सुमारे ५० गरजू लोक उघड्यावर राहात आहेतभिक्षुक, बेघर, कामगार हे स्टेशन परिसर, श्री  सिद्धेश्वर मंदिर, एसटी स्टँड येथे थांबले काही लोक बेघर, काही कुष्ठरोग वसाहतीतील तर काही बाहेरगावातील आहेत

सोलापूर : शहराच्या विविध ठिकाणी असणाºया गरजू व्यक्तींचे जेवणाविना हाल होत असल्याचे दिसत आहे. एकवेळच्या जेवणासाठी ते हताश मनाने सामाजिक कार्यकर्त्यांची वाट पाहत आहेत. जे मिळेल त्याची बचत करुन पुढच्या वेळची पोटाची खळगी भरत आहेत. सामाजिक संस्था, संघटना यांचा उत्साह थंडावल्याचे दिसत आहे.

लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून सामाजिक संस्था, संघटना यांच्याकडून गरजूंना अन्नधान्याचे वाटप होत होते. अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहाने चारचाकी, दुचाकीवरुन कार्यकर्ते भात, भाजी, बिस्किटांचे वाटप करत होते. हा उत्साह आता थंडावल्याचे पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या काळात गरजूंना इतके अन्न मिळायचे की ते आता बस असे म्हणायचे; मात्र जसजसा लॉकडाऊनचा काळ वाढत चालला तसे सामाजिक संस्था संघटनांचे अन्नवाटपाचे उपक्रम कमी झाले आहेत.

रेल्वे स्टेशन परिसरात सुमारे ५० गरजू लोक उघड्यावर राहात आहेत. तसेच भिक्षुक, बेघर, कामगार हे स्टेशन परिसर, श्री  सिद्धेश्वर मंदिर, एसटी स्टँड येथे थांबले आहेत. यातील काही लोक बेघर, काही कुष्ठरोग वसाहतीतील तर काही बाहेरगावातील आहेत. या सर्वांना अन्नासाठी सामाजिक संघटनांचा मदतीचा हात होता. आता हा हात आखडता झाला आहे. एखाद्या वेळेस कुणीतरी येतो आणि जेवण देतो. तो आला तर ठिक नाहीतर उपाशीच झोपणे त्यांच्या वाट्याला आले आहे.

सिव्हिलमधील धर्मशाळा बंद- छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल) अनेक रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांच्या देखभालीसाठी रुग्णाचे नातेवाईक येत असतात. या नातेवाईकांच्या राहण्याची सोय सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील धर्मशाळेत केली जाते. नाममात्र पैसे घेऊन येथे रुग्णाचे नातेवाईक मुक्काम करतात; मात्र  १३ एप्रिल रोजी धर्मशाळेच्या गेटवर धर्मशाळा बंद असल्याचा फलक लावण्यात आला आहे. ही धर्मशाळा बंद असल्याने अनेक गरजू नातेवाईकांच्या रात्री राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. धर्मशाळा बंद असल्याने काही नातेवाईक हे रुग्णालयाच्या पायरीवर झोपत आहेत.

सुरुवातीचे १० ते १५ दिवस खूप देत होते. मी ते एकत्र करुन दुसºयांना देत होतो. मागील तीन ते चार दिवसांपासून जेवणाचे हाल होत आहेत. ज्यांच्याकडे पैसे आहेत, ते शिवभोजनाच्या माध्यमातून आपली भूक भागवत आहेत. तेही निर्धारित वेळेतच मिळते. एकदा मिळालेल्या जेवणातील भात खाऊन रात्री भाकरी किंवा पोळी राखून ठेवली जात आहे. ज्यांना जेवायला मिळत नाहीत ते उपाशी झोपत आहेत. एखादा व्यक्ती जवळून जात असला की त्याच्याकडे हे गरजू लोक आशेने पाहतात.- एक गरजवंत

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस