पंढरपूर : चंद्रभागा नदी जवळील कुंभार घाटा नजिक नव्याने बांधण्यात आलेला घाट सहा जणांच्या अंगावर कोसळला. यामुळे दगड माती खाली दबून सहा जणांचा मृत्यू झाला. या घटनेस कारणीभूत असलेल्या घाटाच्या कामाच्या ठेकेदार विरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रभागा नदी लगत कुंभार घाट येथे घाट निर्मितीचा ठेका ठेकेदार अशोक भागवत इंगोले व हुले ए बी आय सह कन्स्ट्रक्शन बीड यांनी घेतला आहे. त्या कामावर सुदीप गोपाल चमारिया (वय २०, रा. १०३ समृध्दी हेरिटेज जुळे, सोलापूर) व साक्षीदार हे देखरेख करत होते.
त्यावेळी त्यांनी ठेकेदार अशोक भागवत इंगोले यांना घाट भिंतीचे उंची जास्त असलेने त्यांना आवश्यक सुरक्षा कठडे ,दर्शक फलक बोर्ड ,रेलिंग ग्रील सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या उपाययोजना करण्याबाबत व उर्वरित राहिलेले बांधकाम पूर्ण करणे बाबत लेखी व तोंडी सूचना देऊन ही त्यांनी त्यात हलगर्जीपणा केला आहे.
मंगेश गोपाळ अभंगराव (वय ३०), गोपाळ लक्ष्मण अभंगराव (वय ७०), राधा गोपाळ अभंगराव (वय ६०, तिघे रा कुंभार घाट, पंढरपूर), संग्राम उमेश जगताप (वय १४ रा भडीशेगाव ता.पंढरपुर) व दोन अनोळखी महिला (वय अंदाजे ५५ ते ६०)यांच्या अंगावर घाट बांधकामाची भराव केलेले दगडे, चुना, माती, वाळू कोसळले. त्याखाली दबून त्यांचे सर्वांचे मृत्यू झाला. तसेच घाट बांधकामाचे नुकसानीस कारणीभूत झाले. म्हणून ठेकेदार अशोक भागवत इंगोले व हुले ए बी आय सह कन्स्ट्रक्शन बीड यांच्याविरुद्ध भा.द.वि.क ३०४ (अ) ४२७,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.पो.नि. शिवाजी करे करीत आहेत.