तालुक्याची लोकसंख्या ३ लाख १ हजार ५६५ इतकी आहे. यापैकी ६७ टक्के म्हणजेच १८ वर्षे वयोगटापुढील २ लाख २ हजार ४९ इतके लोक लसीकरणाला पात्र ठरले आहेत. दुसऱ्या लाटेत कोरोनावर मात करण्यासाठी एकमेव लसीकरण रामबाण उपाय असल्याचे सांगितले गेले. तेव्हा प्रत्येक केंद्रावर लसीकरणाला नागरिकांची मोठी गर्दी झाली. २५ केंद्रांवर लसीकरणाचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, लसीच्या तुटवड्यामुळे बरीचशी केंद्रे बंद करण्यात आली. मागील आठ दिवसांपासून तालुक्यातील हजारो नागरिक लसीच्या प्रतीक्षेत आहेत.
----
साडेपाच महिन्यांत तालुक्यात आतापर्यंत १६.४२ टक्के लसीकरण झालेले आहे. सध्या आठ दिवसांपासून तालुक्यात लस नाही. लवकरच येणार आहे. टप्प्याटप्प्याने लवकरच तालुक्यातील लसीकरण पूर्ण करू.
- डॉ. अश्विन करजखेडे, तालुका आरोग्य अधिकारी
----
अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात लस घेण्यासाठी मी व माझी पत्नी चार वेळा जाऊन आलो. मात्र, रांगेतील गर्दी व उपलब्ध लस बघता आमचे आतापर्यंत नंबर आलेच नाहीत. रोज चौकशी करीत आहोत. अद्याप लस मिळाली नाही.
-काशीराया मलगोंडा, नागरिक
---