यावेळी ऊस गळितास दोन ते तीन महिने उलटून गेले. मात्र, कारखानदारांनी अद्यापि उसाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले नाहीत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. अतिवृष्टीची नुकसानभरपाई दिली नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत आला आहे. वीज बिलाबाबत येत्या चार दिवसांत निर्णय न झाल्यास ऊर्जामंत्र्याला जिल्हाबंदी करू, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही विरोधी पक्षाची भूमिका बजावली नाही, वीज बिलाबाबत त्यांनीही अधिवेशनात आवाज उठवला नाही. त्यामुळे त्यांची भूमिका चुकीची वाटते, असा आरोप केला.
या रास्ता रोकोचे निवेदन महावितरणचे उपकार्यकारी अभियंता हेमंत ताकपिरे यांनी स्वीकारले, तर पोलीस निरीक्षक अशोक सायकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष माने यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
यावेळी शेतकरी संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष नानासाहेब मोरे, कार्याध्यक्ष विकास जाधव, भीमाचे माजी संचालक उत्तम मुळे, उपाध्यक्ष नितीन जरग, संतोष बचुटे, नानासाहेब कौलगे, कुमार गोडसे, महादेव गायकवाड, बाळासाहेब शेवाळे, भगवान गायकवाड, सुरेश नवले, गणेश भोसले, छोटू सातपुते
आदींसह परिसरातील शेतकरी व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटोओळी-
रास्ता रोको आंदोलनप्रसंगी पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांना निवेदन देताना प्रभाकर देशमुख व शेतकरी.
----