कोरोना प्रतिबंधात्मक उपायांबाबत प्रशासन अनेक वेळा कठोर भूमिका घेत आहे. ही बाब जेवढ्या प्रखरतेने केली जात आहे तेवढ्या प्रखरतेने लसीची उपलब्धता व आग्रह प्रशासन का करीत नाही ? असा संतप्त सवाल नागरिकांमधून पुढे येत आहे. लसीचा तुटवडा गेल्या काही महिन्यांपासून सतत असल्यामुळे शेकडो नागरिकांना लसीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. याबाबतीत लोकप्रतिनिधी व प्रशासन आपली जबाबदारी झटकून बाजूला होण्याचा प्रयत्न करीत आहेत.
तालुक्यात लसीकरणासाठी ३ लाख ४७ हजार ५४० लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. मात्र, अद्याप अंदाजे १७ टक्के लोकांनाच पहिला डोस मिळाला असल्यामुळे लसीकरणाची धीमी गती चिंताजनक ठरत आहे.
----
तिसऱ्या लाटेचे मिळणारे संकेत लसीकरण वेळेत पूर्ण न झाल्यास धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपायांबरोबरच लसीकरणाबाबत हलगर्जीपणा करू नये यात लोकप्रतिनिधी व प्रशासनाने गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.
- डॉ. आप्पासाहेब देशमुख, माजी उपनगराध्यक्ष
----
प्रवास लसीकरणाचा
२७ जुलैपर्यंत तालुक्यात वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी ५ हजार २५, फ्रन्टलाइन वर्कर ५ हजार ६६ , १८ ते ४४ वयोगटातील ४ हजार ७०६, १८ते ३० वयोगटातील १ हजार ७३०, ३० ते ४४ वयोगट १ हजार ५३१, दुसरा डोस २२ हजार ९१० असे एकूण ८३ हजार ६५२.
---