आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १५ : दुष्काळसदृश जिल्ह्यातील शिंगडगाव़़़ समाजकार्यच्या विद्यार्थ्यांची टीम पोहोचते़़़दोन दिवस श्रमदानातून लघु बंधारा उभारतात़़़एवढ्यावरच न थांबता शिवार फेरी काढून पाणी अडवा, पाणी जिरवाचा संदेश देतात़़़अन् गावात परिवर्तनाचे वारे वाहतात़ ही किमया केली आहे भारती विद्यापीठाच्या समाजकार्य(प्रथम वर्ष) विभागाच्या विद्यार्थ्यांनी़ राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या विशेष हिवाळी शिबिराचे उद्घाटन शिंगडगावचे सरपंच मल्लिकार्जुन पनशेट्टी यांच्या हस्ते झाले़ याप्रसंगी भारती विद्यापीठ समाजकार्यचे प्रा़ डॉ़ शशिकांत हिप्परगी, कार्यक्रम अधिकारी डॉ़ प्रा़ जयश्री मेहता, तंटामुक्त समिती अध्यक्ष धोंडिराज कोरे, जि़ प़ शाळेचे मुख्याध्यापक अमिन पटेल, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत कोरे, स्वामी विवेकानंद संस्थेचे अध्यक्ष पंडित अचलेरे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र कोळी, अरविंद वाघमारे, महारुद्र बडुरे यांची उपस्थिती होती़ प्रारंभी सोनाली कुलकर्णी हिने स्वागतगीत सादर करून उपस्थितांचे स्वागत केले़ प्रास्ताविकेतून प्रा़ डॉ़ शशिकांत हिप्परगी यांनी राष्ट्रीय सेवा योजनेमागचा हेतू विशद केला़ यावेळी प्रीती कोरे, आम्रपाली टिळक आणि पौर्णिमा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गावातील महिलांचा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम पार पडला़ त्यानंतर ग्रामस्वच्छतेचा उपक्रम राबवण्यात आला़ शिबिराच्या दुसºया दिवशी माणिक जाधव यांचा ‘हसी के गुब्बारे’ मनोरंजनात्मक कार्यक्रम पार पडला़ शिबिराच्या तिसºया दिवशी मनपा महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अश्विनी चव्हाण यांचे ‘ग्रामीण भागातील महिलांचे योगदान’ या विषयावर व्याख्यान झाले़ शिबिराच्या चौथ्या दिवशी भारती विद्यापीठ बालविकासच्या मुख्याध्यापिका वैशाली मोहोळे यांचे ‘शिक्षण क्षेत्रातील आव्हाने’ या विषयावर मार्गदर्शन झाले़ शिबिराच्या शेवटच्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम आणि पथनाट्यांनी समारोप करण्यात आला़ --------------------लघु बंधारा उभारला़़़शिबिरातील दोन दिवसांत प्रा़ डॉ़ जयश्री मेहता, कृषी अधिकारी आऱ जे़ शिंदे आणि सरपंच मल्लिकार्जुन पनशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी गटाने शेतातील काळी माती खणून २५० पोत्यांमध्ये भरली़ या पोत्यांचा बांध घालून पाणी अडवण्याचे नियोजन आखून दिले़ त्याबरोबरच पावसाळ्यात किती पाणीसाठी होईल याचा अंदाज बांधला़ --------------------प्रबोधन...या विद्यार्थ्यांनी प्रारंभी गावातून सर्व्हे करून किती लोकांकडे शौचालय आहे आणि किती लोकांकडे नाही याची माहिती गोळा केली़ तसेच शौचालयाअभावी निर्माण होणारे आजार, रोगराई प्रतिबंध अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करत प्रबोधन केले़ याबरोबरच हागणदारीमुक्तीवर १२ विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून प्रबोधन केले़ तसेच ग्रामीण विकासाच्या योजना सांगितल्या़
लघु बंधारा उभारून दिला पाणी अडविण्याचा संदेश, शिंगडगावमध्ये परिवर्तनाचे वारे : भारती विद्यापीठ समाजकार्यच्या विद्यार्थ्यांकडून एनएसएस यशस्वी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 1:19 PM
आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १५ : दुष्काळसदृश जिल्ह्यातील शिंगडगाव़़़ समाजकार्यच्या विद्यार्थ्यांची टीम पोहोचते़़़दोन दिवस श्रमदानातून लघु बंधारा उभारतात़़़एवढ्यावरच न थांबता शिवार फेरी काढून पाणी अडवा, पाणी जिरवाचा संदेश देतात़़़अन् गावात परिवर्तनाचे वारे वाहतात़ ही किमया केली आहे भारती विद्यापीठाच्या समाजकार्य(प्रथम वर्ष) विभागाच्या विद्यार्थ्यांनी़ राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या विशेष हिवाळी ...
ठळक मुद्देहागणदारीमुक्तीवर १२ विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून प्रबोधन केले़शेतातील काळी माती खणून २५० पोत्यांमध्ये भरली़ या पोत्यांचा बांध घालून पाणी अडवण्याचे नियोजन रोगराई प्रतिबंध अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करत प्रबोधन केले़