शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

Smart Solapur ; होय.. ‘सोलापूर ब्रॅण्ड’ जगभर झळकतोय !

By सचिन जवळकोटे | Published: January 28, 2019 10:37 AM

सचिन जवळकोटे कोण म्हणतं, ‘सोलापुरात कायबी ºहायलं नाय ?’... कोण म्हणतं; ‘ सोलापूर लय मागं राहिलंय ?’... जरा डोळे ...

ठळक मुद्देजरा डोळे उघडून बघा. तुम्हाला दिसेल बदलत्या सोलापूरची स्मार्ट रूपं.बदललेल्या सोलापूरकरांची स्मार्ट मानसिकता. तुम्हाला  अनुभवता येईल नवा सोलापूर पॅटर्न. सोलापूरच्या ब्रॅण्डिगमध्ये ‘लोकमत’चा राहिलाय  नेहमीच मोलाचा वाटा.

सचिन जवळकोटे

कोण म्हणतं, ‘सोलापुरात कायबी ºहायलं नाय ?’... कोण म्हणतं; ‘सोलापूर लय मागं राहिलंय ?’... जरा डोळे उघडून बघा. तुम्हाला दिसेल बदलत्या सोलापूरची स्मार्ट रूपं. बदललेल्या सोलापूरकरांची स्मार्ट मानसिकता. तुम्हाला  अनुभवता येईल नवा सोलापूर पॅटर्न. होय.. जगभरात ‘सोलापूरचा ब्रॅण्ड’ वेगवेगळ्या माध्यमातून झळकतोय... म्हणूनच आज ‘प्रजासत्ताक दिना’च्या शुभदिनी ‘लोकमत’नं  घडविलीय ‘पॉझिटिव्ह सोलापूर’ची पानोपानी चर्चा... कारण सोलापूरच्या ब्रॅण्डिगमध्ये ‘लोकमत’चा राहिलाय  नेहमीच मोलाचा वाटा.

  • - काही दिवसांपूर्वी शहरात फिरत असताना रात्रीच्या वेळी एके ठिकाणी वेगळं दृष्य दिसलं. रस्त्यातल्या दुभाजकात लावलेलं एक इवलंसं रोपटं खाली पडलं होतं. एक दुचाकीस्वार तिथंच आपली गाडी थांबवून ते रोपटं नीट लावत होता. उत्सुकतेनं विचारलं, ‘काय करताय.. तुमचा काय संबंध?’ तो दचकला, गडबडला; मात्र आपलं काम पुन्हा मनापासून करत एवढंच म्हणाला, ‘आपल्या महापालिकेचं झाड आहे ना... म्हणून नीट लावतोय!’
  • - ‘आपली महापालिका !’.. हा शब्द कानाला नवा होता; परंतु कौतुकास्पद होता. जेव्हा सर्वसामान्यांना आपलं गाव आपलं वाटू लागतं. गावच्या समस्या आपल्या वाटू लागतात, तेव्हा सुरू होते गावच्या उज्ज्वल भविष्याला अचूक दिशा मिळण्याची प्रक्रिया. ‘गिरणगाव’चं ‘ग्रीन गाव’ होण्याची नवी विचारधारा.
  • - ‘ग्रीन गाव’ म्हणजे शब्दश: झाडा-झुडुपांचं गाव नव्हे. ‘ग्रीन गाव’ म्हणजे मनातला ‘निगेटिव्ह रेड’ कलंक पुसून टाकणारा ‘पॉझिटिव्ह ग्रीन’ कलर... कारण आजपावेतो ‘सोलापूर म्हणजे निव्वळ निष्क्रिय गाव’ अशी नकळत आपलीच बदनामी करण्यात काहीजण रमले. 
  • -‘सोलापूरच्या गिरण्या बंद पडल्या म्हणजे गिरणगावाचं भविष्यही उद्ध्वस्त झालं,’ या पराभूत मानसिकतेत ऊर बडवत, धाय मोकलून रडणाºयांनी नव्या पिढीचाही आत्मविश्वास लहानपणीच जिरविला. याच हतबल भ्रमात कैकजण जगले.
  • - ...मात्र आता परिस्थिती पूर्णपणे पालटतेय, काळ बदलतोय. भूतकाळातल्या भग्नावशेषांना गाडून वेगळं भविष्य घडविण्यासाठी नवी पिढी आसुसलीय. होय... सोलापूरचा ब्रॅण्ड जगभरात पोहोचविण्यासाठी ही पिढी कामाला लागलीय.

 एक हजारांंहून अधिक ग्लोबल सोलापूरकर- तुम्हाला माहिताय काय... मुंबईच्या मंत्रालयात दोनशेपेक्षाही जास्त सोलापूरकर मोठ्या पदावर काम करतात. अवघ्या महाराष्ट्राचा कारभार पाहतात. शिक्षण अन् नोकरीसाठी  एक हजारांहून अधिक सोलापूरकर परदेशात स्थायिक झालेत. याच ‘ग्लोबल सोलापूरकर’ मंडळींनी त्या-त्या देशात आपल्या कर्तृत्वानं सोलापूरचं नाव मोठं केलंय. 

नॉट ओन्ली धार्मिक स्थळ.. टुरिझम हब !

  • - मध्यंतरी जर्मनीचं एक दाम्पत्य पर्यटनासाठी भारतात आलेलं. ‘गुगल’वर सर्च करताना त्यांना सोलापूरचं सिद्धेश्वर मंदिर दिसलं. फोटोचं आकर्षण वाटलं. ते शोधत शोधत इथं आले. सिद्धरामाचं दर्शन घेतलं. परिसर पाहून ‘वॉवऽऽ इटस् व्हेरी नाईस !’ म्हणत निघून गेले. जाताना त्यांनी इथल्या अनेक हेरिटेज वास्तूंच्या आठवणी ‘सेल्फी’त क्लिक केल्या. मनात जतन केल्या.
  • - यापूर्वीही इथं लाखो पर्यटक येऊन गेले; परंतु या जर्मनी दाम्पत्याचा पाहुणचार सोलापूरकरांनी ज्या पद्धतीनं केला, तो साºयांसाठीच कौतुकाश्चर्याचा. नवलाईचा. या दाम्पत्याला चक्क विभूती पट्टा लावून प्रसाद देण्यात काही जण पुढं सरसावले. सोलापूरचा इतिहास, सोलापूरची संस्कृती अन् सोलापूरची खरी ओळख पटवून देण्यात हे सोलापूरकर यशस्वी ठरले... अन् हाच सूक्ष्म बदल सांगतोय की, सोलापूरकर स्मार्ट बनतोय. तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट अन् गाणगापूर करत-करत सोलापुरात येणाºया नव्या पर्यटकालाही आपल्या गावचं महत्त्व पटवून देण्याची प्रामाणिक इच्छा व्यक्त करतोय. सोलापूरला ‘टुरिझम हब’ बनविण्यासाठी प्रचंड धडपडतोय. होय... सोलापूरचा ब्रॅण्ड जगभरात झळकविण्यासाठी स्मार्ट सोलापूरकर पुढाकार घेतोय.

 स्वत:ला बदलून घेण्याची साºयांचीच धडपड !

  • - ‘इंटरसिटी’नं वन-डे ट्रीप करून पुण्याच्या लक्ष्मी रोड अन् टिळक रोडवरनं ब्रॅण्डेड कपडे खरेदी करणाºयांना पूर्वी हे माहीत नव्हतं की, यातले कित्येक ड्रेस सोलापूरच्या एमआयडीसीतच तयार झालेत. याची जाणीव जेव्हा ‘आमची खरेदी सोलापुरात’मधून ‘लोकमत’नं करून दिली तेव्हा स्मार्ट सोलापूरकरांनी बदलून घेतलं स्वत:ला झटकन्.
  • - दिवाळीतला हा आनंद द्विगुणित झाला सिद्धेश्वर यात्रेत. दोनशे वर्षांपूर्वीची ‘पुणेरी पगडी’ त्या शहराचा ब्रॅण्ड होऊ शकते... दीडशे वर्षांपूर्वीचा ‘कोल्हापूरचा गूळ’ ब्रॅण्ड होऊ शकतो; मग साडेनऊशे वर्षांपूर्वीचा नंदीध्वज सोलापूरचा ब्रॅण्ड का होऊ शकत नाही? हा ‘लोकमत’चा सवाल लाखो सोलापूरकरांच्या काळजाला भिडला. त्यातूनच पुनश्च साजरी झाली जानेवारीतच दिवाळी.
  • - हे सारे बदल स्पष्ट करताहेत की, होय.. सोलापूरकर पूर्णपणे बदलत चाललाय. सोलापूरचा ब्रॅण्ड जगभरात झळकविण्यासाठी पुन्हा एकदा उत्साहानं पुढं सरसावलाय. बस्स्. आजच्या प्रजासत्ताकदिनी इतकंच. धन्यवाद!

नव्या पिढीला मेट्रोचं आकर्षण..

  • - काही महिन्यांपूर्वी ‘पुणेरी सोलापूरकर’ हा विषय ‘लोकमत’नं उचलून धरलेला. यातून पुनश्च: स्थलांतराचा विषय चर्चिला गेला. सोलापूरची मंडळी बाहेर जाऊन मोठी होताहेत, याचं अनेकांनी कौतुक केलं... मात्र सोलापुरात काही चांगलं होत नाही म्हणून इथली पुढची पिढी गाव सोडून गेली, ही नकारात्मक भूमिका मात्र मनाला बोचणारी. टोचणारी.
  • - खरंतर, स्थलांतर हा प्रकार पाषाणयुगापासून चालत आलेला. पाण्याच्या शोधात अनेक मानवी  टोळ्या सतत स्थलांतरित होत राहिल्या. वस्त्या बदलत गेल्या. त्यानंतरचा काळ आला साम्राज्य विस्ताराचा. राजे-रजवाड्यांच्या काळात सत्ता गाजविण्यासाठी अनेक समूह नवनवा प्रांत शोधत गेले. आता जमाना आलाय बदलत्या लाईफ स्टाईलचा. ‘मॉल, मल्टीफ्लेक्स अन् पब’च्या आकर्षणातून जगभरातीलच नवी पिढी मेट्रो सिटीकडं आकर्षित होऊ लागलीय.
  • - मध्यंतरी पुण्यात हरियाणाकडचा एक सुशिक्षित तरुण भेटलेला. बोलता-बोलता त्याला सहज विचारलं, ‘एवढ्या दूर कसं काय स्थायिक होण्याचा निर्णय घेतला?’ त्यावेळी त्यानं सांगितलेलं उत्तर धक्कादायक होतं. ‘जब हम कॉलेज मे अ‍ॅडमिशन लेते हैं, उसी वक्तही पुना मे सेटल होने का सपना देखते हैं!’... 
  • - म्हणजे बघा. साºया देशालाच लागलेत पुण्याचे वेध. मग चार-पाच तासांच्या अंतरावर असलेल्या सोलापूरबद्दल अधिक काय बोलावं ? त्यामुळं मेट्रोच्या आकर्षणाला गावची हतबलता न समजता या विषयाकडं आता आपण पाहायला हवं नव्या दृष्टिकोनातून. सोलापूरच्या तरुणांकडं क्वॉलिटी आहे म्हणूनच पुण्यातल्या प्रत्येक कंपनीत एक ना एक सोलापूरकर भेटतोय. तेही साध्यासुध्या नव्हे; उच्च पदावर!
टॅग्स :SolapurसोलापूरSmart Cityस्मार्ट सिटीtourismपर्यटन