-आप्पासाहेब पाटीलसोलापूर - सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावरील चिंचोळी औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) मधील एका कंपनीवर मुंबई पेालिसांनी अचानक धाड टाकली. या धाडीत मुंबई पोलिसांनी १६ कोटी रुपयांचे ८ किलो ड्रग्ज जप्त केले.
चिंचोळी एमआयडीसी परिसरात मागील काही वर्षांपासून बंद पडलेली कंपनी होती. या बंद पडलेल्या कंपनीत ड्रग्ज तयार करण्यात येत असल्याची माहिती मुंबई पाेलिसांना मिळाली होती. या माहितीवरून मुंबईचे पोलिस रविवारी मध्यरात्री एक वाजता चिंचोळी एमआयडीसी परिसरात दाखल झाले. त्यांनी औद्योगिक वसाहतीमधील इतर लोकांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी कंपनीची माहिती घेऊन परिसराची पाहणी केली. या पाहणीत १६ कोटी रुपयांचे ८ किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. कारवाई करण्यात आलेल्या कारखान्यावर कोणतेही नाव नाही. दरम्यान, कारखाना अनेक वर्षांपासून बंद आहे, कारखान्यावर कोणताही बोर्ड नसल्याचे पाहणीत आढळून आले.