- शीतलकुमार कांबळेसोलापूर : शहराला पुरविल्या जाणाऱ्या पाण्यापैकी ३० टक्क्यांपेक्षा अधिक म्हणजेच तब्बल सहा कोटी लिटर पाणी दररोज वाया जाते. पाण्याचे दर वाढविण्यापेक्षा वाया जाणारे पाणी आधी थांबवायला हवे, अशी मागणी पर्यावरणप्रेमींमधून होत आहे.शहराची लोकसंख्या सुमारे ११.५ लाख इतकी आहे. दिवसाला प्रति माणशी१०० ते १०५ लिटर इतके पाणी महापालिकेतर्फे शहराला पुरविण्यात येते. विविध स्रोतांच्या माध्यमातून महापालिका १६० एमएलडी पाण्याचा उपसा करते, तर सुमारे १०० एमएलडी पाणी प्रत्यक्ष सोलापूरकरांना मिळते. गळती, औद्योगिक वापर, प्युरिफिकेशन लॉस, पाणी शहराकडे आणताना होणारा काही प्रमाणातील अपव्यय मिळून सुमारे ६० एमएलडी, म्हणजेच सहा कोटी लिटर पाणी वाया जाते.उजनी धरण ते सोलापूर शहर अशी थेट पाईपलाईन (११० किलोमीटर) ४० टक्के , टाकळी येथील बंधारा ५० टक्के व हिप्परगा तलाव येथून १० टक्के इतके पाणी शहरासाठी वापरले जाते. महापालिकेला प्रत्येक १ हजार लिटरसाठी सरासरी १३ रुपये इतका खर्च येतो. पाण्याची गळती ३० टक्के इतकी असून, सुमारे १० टक्के पाण्याची चोरी होते. नागरिकांसाठी आकारण्यात येणारा पाण्याचा दर हा १००० लिटरमागे ११.२५ रुपये इतका आहे. सध्या सरासरी पाण्याची थकबाकी ही ३.५ कोटी असल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले.उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनीसाठी भूसंपादनाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. माढा, मोहोळ व उत्तर सोलापूर तालुक्यांतील ३३ गावांचे ६३१ गट निश्चित करण्यात आले आहेत. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून होणाºया उजनी ते सोलापूर समांतर दुहेरी जलवाहिनीच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होत आहे. उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यासाठी म्हणजे प्रत्यक्ष पाईप टाकण्यासाठी सुमारे एक वर्षाचा कालावधी लागू शकतो.11,50,000 सोलापूरची लोकसंख्या100-105 लिटर पाणी पालिका प्रति माणशीदिवसाला पुरवते30% पाण्याची गळती10% पाण्याची चोरी"11.25-11.70 घरगुती दर (प्रति एक हजार लिटर)"35.10-37.80 व्यावसायिक दर (प्रतिएक हजार लिटर)"11,556 अर्धा इंची पाईप असेल, तर वार्षिक दर"23,108 पाऊणइंची पाईप असेल तर वार्षिक दर3.5 कोटी रुपये पाणीपट्टी थकीत असल्याचे महापालिकेतर्फे सांगितले.160 एमएलडी पाण्याचा उपसा विविध स्रोतांच्या माध्यमातून रोज पालिका करतेशहरात पाणी आणण्यासाठी वापरण्यात येणारे पाईप जुने झाले आहेत. त्यामुळे काही प्रमाणात पाणी गळती होते. या पाईपलाईन दुरुस्तीचा प्रस्ताव जीवन प्राधीकरणाच्या माध्यमातून ठेवण्यात आला आहे.- संजय धनशेट्टी,सार्वजनिक आरोग्य अभियंताशहरात नवी पाईपलाईन गरजेची आहे. पाणी शुद्धीकरणासाठी वापरण्यात येणारे तंत्रज्ञानही जुने झाले आहे. नव्या तंत्राने पाणी शुद्ध केल्यास या प्रक्रियेतून जे पाणी वाया जात होते, त्यावर नियंत्रण आणता येऊ शकते.- विलास लोकरे, अध्यक्ष,सीना-भीमा नदी संघर्ष समिती
सोलापुरात दररोज तब्बल ६ कोटी लिटर पाणी वाया
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 4:03 AM