- शीतलकुमार कांबळेसोलापूर - कुटुंबाला देवाची कृपा लाभावी म्हणून विवाह होताच डोक्यावर जट धारण करणाऱ्या महिलेची जतेतून मुक्ती करण्यात आली. 21वर्षे केसांची काळजी न घेता जट पायाच्या गुडग्यापर्यंत वाढवून स्व:ताचे आरोग्य धोक्यात टाकणाऱ्या राधाबाई राजगुरू( वय 50 ) या अखेर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या जट निर्मुलन उपक्रमामुळे जटमुक्त झाल्या.
देगाव येथील डॉ आंबेडकर नगर येथे वास्तव्यास असलेल्या राजगुरू कुटुंबातील राधाबाई राजगुरू यांनी डोक्यावर जट वाढविल्याची माहिती अंनिस राज्य कार्यकारिणी सदस्य नंदिनी जाधव यांना मिळाली. त्यांनी राधाबाई यांची कन्या चंदाराणी काबंळे (कोल्हापूर)यांच्याशी संपर्क साधला मातोश्रीचे प्रबोधन करावे असा सल्ला दिला. तो मान्य करून चंदाराणी यांनी आपल्या आईचे प्रबोधन केले. त्यानंतर नंदिनी जाधव ( पुणे ) यांनी राधाबाई यांना जटमुक्त केले. यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य मिलिंद देशमुख (देहु )अण्णा कडलासकर( पालघर) निशा भोसले (सोलापूर) शहर अध्यक्ष प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे कार्याध्यक्ष व्हि.डी.गायकवाड ,शहर महिला विभाग प्रमुख डॉ अस्मिता बालगावकर ,रविकिरण राजगुरू ,रणजित हिरवे आदी उपस्थित होते.
नंदिनी जाधव (पुणे) यांनी आत्तापर्यंत 271 महिलांना जटमुक्त केले आहे. राधाबाई राजगुरू यांचे जट निर्मुलनासाठी त्यांची कन्या चंदाराणी यांनी प्रबोधन केले. भाऊ रविकिरण याने समर्थपणे साथ दिली.