शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सोलापुरात बायकोचा खून करून नवरा थेट पोलीस ठाण्यात हजर; मनगटावर, पोटावर तिक्ष्ण हत्यारानं वार

By विलास जळकोटकर | Updated: April 15, 2024 13:04 IST

Solapur Crime News: बायकोचा निर्घृणपणे खून करुन नवरा थेट पोलीस ठाण्यात हजर झाला. ही धक्कादायक घटना सोमवारी सकाळी स्वागत नगर वीटभट्टीसमोर उघडकीस आली. यास्मीन सैफन शेख असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

विलास जळकोटकर  सोलापूर - बायकोचा निर्घृणपणे खून करुन नवरा थेट पोलीस ठाण्यात हजर झाला. ही धक्कादायक घटना सोमवारी सकाळी स्वागत नगर वीटभट्टीसमोर उघडकीस आली. यास्मीन सैफन शेख (वय- ४०, रा. ६०६ पाथ्रुड चौक, शहापूरे यांच्या घरात भाडेकरु, सोलापूर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

आरोपी पतीने पत्नीचा खून करून हत्यारासह स्वतःला एम आय डी सी पोलीस ठाण्यात जाऊन अटक करून घेतली. मृत महिलेचा मृतदेह शहरातील स्वागत नगर परिसरातील वीटभट्टी च्या आवारात मिळून आला. यातील मयत यास्मिन शेख ही महिला पाथ्रुड चौकातील शहापूरे यांच्या घरामध्ये पतीसह भाड्याने राहत होती. रविवारच्या मध्यरात्रीनंतर १.३० च्या सुमारास महादेव केंगनाळकर यांच्या स्वागतनगर येथील दिकोंडा कॅन्टिनसमोर आलेल्या वीटभट्टीजवळ सदर महिलेच्या मनगटावर, पोटावर पतीने तिक्ष्ण हत्याराने वार करुन टाकल्याने ती बेशुद्धावस्थेत आढळूृन आली.

दरम्यान, नवऱ्याने हत्यारासह एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून स्वत:ला अटक करवून घेतल्याचे सांगण्यात येत आहे. खबर मिळताच हवालदार एस. के. चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन बेशुद्धावस्थेतील महिलेला पहाटे तीनच्या सुमारास येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तिची तपासणी केली, मात्र तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. एमआयडीसी पोलीस खून नेमक्या कोणत्या कारणासाठी झाला याचा शोध घेत आहेत.

मिळून केला खून; महिलेच्या भावाचा आरोपमयत महिलेचा भाऊ अरबाज शेख याने भाऊजी सैफन शेख यांच्यावर आरोप करताना त्याने एकट्याने हा खून केला नाही तर त्याच्यासोबत इतरांनी मिळून हा खून केल्याचा आरोप केला आहे, त्यांनाही शिक्षा व्हावी अशी मागणी केली

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी