शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

Solapur: रात्री बस नसल्याने स्टँडवर झोपले, अज्ञाताने धमकी देऊन १८ हजार ढापले, बार्शी बस स्थानकवरील घटना

By शीतलकुमार कांबळे | Published: March 13, 2024 6:38 PM

Solapur: रात्री बार्शी बस स्थानकावरून गावी जाण्यास बस नसल्याने एक व्यक्ती तिथेच झोपला. अनोळखी व्यक्तीने जागे करून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत खिशातील १८ हजार रुपये काढून घेतले. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

- शीतलकुमार कांबळेबार्शी - रात्री बार्शी बस स्थानकावरून गावी जाण्यास बस नसल्याने एक व्यक्ती तिथेच झोपला. अनोळखी व्यक्तीने जागे करून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत खिशातील १८ हजार रुपये काढून घेतले. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. बार्शी बस स्थानकावर ही घटना १३ मार्च रोजी पहाटे चारच्या सुमारास घडली. याबाबत धारलिंग राम हिरे (वय ६० रा. भानसळे ता. बार्शी) यांनी शहर पोलिसात याची तक्रार दिली. पोलिसांनी भांदवी ३९२ प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला.

यातील फिर्यादी हा आई आजारी असल्याने तिला ११ रोजी उपचारास येरवाडा येथील हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला होता. उपचार केल्यानंतर त्याने आईला धनकवडी येथील बहिणीकडे सोडले. फिर्यादी गावी जाण्यास बार्शीला १३ मार्च रोजी रात्री २ च्या सुमारास बार्शी बस स्थानकावर आला होता. रात्री बस नसल्याने तो एका फलाटावर झोपले होते. त्यावेळी त्याच्या खिशात पैसे होते. झोप लागताच खिसे चाचपडत असताना फिर्यादीने आरोपीस बाजूला ढकलून दिले. त्यावेळी आरोपीने फिर्यादीस त्याच्या गळ्यातील गमज्यानी खाली ओढून मारहाण केली. त्यास तुझ्या खिशातील पैसे दे नाहीतर तुला जीवे ठार मारीन अशी, धमकी देऊन खिशातील रक्कम जबरदस्तीने काढून नेली, अशी तक्रार दाखल करण्यात आली. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल गणेश वाघमोडे करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSolapurसोलापूर