आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २४ : मागील तीन वर्षांपासून कांद्यासह शेतीमालाला भाव नसल्याची मोठी ओरड सुरू असताना गुरुवारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन वर्षांनंतर कांद्याला उच्चांकी क्विंटलला ५ हजार २५० रुपये दर मिळाला. सोलापूर जिल्ह्यातच कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी खूश आहेत. नाशिक, लासलगाव पेक्षाही सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याची मोठी उलाढाल होते. मागील दोन वर्षांत मात्र कांद्याची आवक अधिक मात्र दर नसल्याने शेतकरी तीव्र नाराजी व्यक्त करीत होते. शेतकºयांची मोठी नाराजी असतानाही शेतकºयांच्या कोणत्याही मालाला दर मात्र मिळत नव्हता. सोेलापूर बाजार समितीमध्ये गुरुवारी कुर्डूवाडीच्या हरिदास काळे यांच्या कांद्याला प्रतिक्विंटल ५२५० रुपयांचा दर मिळाला. मागील वर्षी दोन हजारांपेक्षा अधिक दर संपूर्ण वर्षभरात मिळाला नव्हता. यावर्षी दररोज कांद्याचे दर वाढतच आहेत. गुरुवारी सोलापूर बाजार समितीमध्ये २०४ ट्रक कांद्याची आवक झाली. बुधवारी २१० ट्रक आवक व अधिकाधिक ५ हजार १०० क्विंटलला दर मिळाला होता. आॅगस्ट २०१५ मध्ये सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा सर्वाधिक ७ हजार ४०० रुपयाने विकला होता. --------------अधिकाधिक अन् कमीत कमी च्मागील वर्षी अधिकाधिक क्विंटलला १८०० रुपयांचा दर मिळणेही मुश्कील होते. अतिशय दर्जेदार कांदाही ५००-७०० रुपयांच्या दराने मागील वर्षी विक्री करावा लागला होता. यावर्षी मात्र कमीतकमी १८०० रुपयाने कांद्याची विक्री होत आहे.
सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला उच्चांकी ५२५० रुपयांचा दर, रोज वाढतोय दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 10:30 AM
मागील तीन वर्षांपासून कांद्यासह शेतीमालाला भाव नसल्याची मोठी ओरड सुरू असताना गुरुवारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन वर्षांनंतर कांद्याला उच्चांकी क्विंटलला ५ हजार २५० रुपये दर मिळाला.
ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यातच कांद्याला चांगला भावदोन वर्षांनंतर कांद्याला उच्चांकी क्विंटलला ५ हजार २५० रुपये दरसोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याची मोठी उलाढाल