आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १७ : सोलापूर आणि बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या गणरचनेची आरक्षण सोडत शनिवार, २० जानेवारी रोजी काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. दरम्यान, करमाळा बाजार समितीच्या निवडणुकीची गणरचना जाहीर करण्यात आली आहे. बाजार समित्यांच्या निवडणुका आता थेट शेतकºयांच्या मतदानाद्वारे होणार आहेत. जिल्हा निवडणूक कार्यालयाने सोलापूर, बार्शी, करमाळा बाजार समितीची गणरचना आणि मतदार यादी तयार केली आहे. या यादीवर हरकती घेण्यात येणार आहेत. गणरचनेची आरक्षण सोडत शनिवार, २० जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात होणार आहे.---------------------करमाळा बाजार समितीची गणरचना आणि गावांचा तपशील १. जातेगाव : जातेगाव, खडकी, आळजापूर, तरटगाव, पाडळी, कामोणे, जातेगाव, मांगी, बाळेवाडी, बिटरगाव श्री. २. पोथरे : करमाळा, देवीचामाळ, खांबेवाडी, बोरगाव, निलज, पोटेगाव, घारगाव, हिवरवाडी, पोथरे, भोसे, पिंंपळवाडी. ३. रावगाव : रावगाव, पुनवर, लिंबेवाडी, वडगाव द, वडगाव उ, वंजारवाडी. ४. वीट : वीट, विहाळ, मोरवड, अंजनडोह, देवळाली, रोशेवाडी. ५. सावडी : कोर्टी, गोरेवाडी, घुलगेवाडी, कुस्करवाडी, पोंधवडी, सावडी, कुंभारगाव, घरतवाडी. ६. जिंती : जिंती, कों. चिंचोली, रामवाडी, कावळवाडी, भिलारवाडी, देलवडी, भगतवाडी, कात्रज, टाळकी रा. ७. राजुरी : केत्तूर, पारेवाडी, हिंगणी, पोमलवाडी, गुलमरवाडी, दिवेगव्हाण, खातगाव, राजुरी. ८. वाशिंबे : चिखलठाण, कुगाव, गोयेगाव, केडगाव, सोगाव, उंदरगाव, रिटेवाडी, मांजरगाव, दहिगाव, वाशिंबे. ९ उम्रड : उम्रड, कुंभेज, खडकेवाडी, पोफळज, जेऊरवाडी, जेऊर, शेटफळ. १०. झरे : पांडे, करंजे, सरपडोह, धायखिंडी, गुळसडी, झरे, वरकटणे. ११. हिसरे : अर्जुननगर, मिरगव्हाण, हिवरे, कोळगाव, निमगाव ह., हिसरे, फिसरे, शेलगाव क, सौंदे, भालेवाडी, दिलमेश्वर. १२. साडे : साडे, आवाटी, नेरले, सालसे, अळसुंदे, गौंडरे. १३. केम : केम, पाथुर्डी, मलवडी, घोटी, वरकुटे. १४. वांगी : वांगी १ ते ४, भिवरवाडी, ढोकरी, लव्हे, शेलगाव वा., कोंढेज, निंभोरे. १५. कंदर : कंदर, सातोली, वडशिवणे, कविटगाव, पांगरे, भाळवणी, सांगवी, बिटरगाव वा.
सोलापूर बाजार समिती निवडणुकीसाठी सोलापूर, बार्शीची आरक्षण सोडत २० जानेवारीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 2:08 PM
बाजार समित्यांच्या निवडणुका आता थेट शेतकºयांच्या मतदानाद्वारे होणार आहेत. जिल्हा निवडणूक कार्यालयाने सोलापूर, बार्शी, करमाळा बाजार समितीची गणरचना आणि मतदार यादी तयार केली आहे. या यादीवर हरकती घेण्यात येणार आहेत
ठळक मुद्देगणरचनेची आरक्षण सोडत शनिवार, २० जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात करमाळा बाजार समितीच्या निवडणुकीची गणरचना जाहीर करण्यात आली जिल्हा निवडणूक कार्यालयाने सोलापूर, बार्शी, करमाळा बाजार समितीची गणरचना आणि मतदार यादी तयार केली