शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

सोलापूरातील उद्योगांपुढे महागाईचे संकट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2018 11:55 AM

रूपया घसरल्याचा परिणाम :  सोलापुरातील वस्त्रोद्योग, कारखान्यातील आयात वस्तूंचे दर वाढले

ठळक मुद्देअमेरिकन डॉलरच्या तुलनेत रूपयाची दिवसेंदिवस घसरण सोलापुरातील मोठ्या उद्योगांनाही महागाईचे संकटआयात कराव्या लागणाºया कच्च्या मालाचे दर वाढले

रवींद्र देशमुख सोलापूर : अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रूपयाची दिवसेंदिवस घसरण होत असल्यामुळे सोलापुरातील मोठ्या उद्योगांनाही महागाईचे संकट झेलावे लागत असून, वस्त्रोद्योगासाठी लागणारे यार्न, फौंड्रीसाठी लागणारी सँड आणि अन्य कारखान्यांच्या आयात कराव्या लागणाºया कच्च्या मालाचे दर वाढले आहेत; मात्र प्रिसिजन कॅमशाफ्ट्स, बालाजी अमाईन्स या कंपन्या निर्यातही करत असल्यामुळे त्यांना सध्याच्या निर्यातीचा लाभही मिळत आहे.

टॉवेल आणि चादर निर्मितीसाठी देशात प्रसिध्द असलेला येथील वस्त्रोद्योग स्पर्धा आणि अन्य प्रश्नांमुळे अडचणीत आला असून, दोन - तीन वर्षांपूर्वी ५०० कोटींच्या घरात असलेली निर्यात आता निम्म्याने कमी झाली आहे. त्यामुळे रूपयाच्या अवमूल्यनाचा वस्त्रोद्योगाला लाभ कमीच आहे. सोलापुरातील निर्यातदार यंत्रमागधारक धाग्यामध्ये पॉलिस्टर यार्न आणि कलर यार्नचा वापर करतात. हा वापर एकूण यार्न वापराच्या २० टक्के इतका कमी असला तरी तो आयातच करावा लागतो. रूपया घसरल्यामुळे दोन्ही यार्नचा दर किलोमागे १० ते १५ रूपयांनी वाढलेला आहे, अशी माहिती यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांनी दिली.

लक्ष्मी हायड्रॉलिक्सचे व्यवस्थापकीय संचालक शरद ठाकरे म्हणाले की, रूपयाचे अवमूल्यन झाल्यामुळे पंप्स आणि इलेक्ट्रिक मोटारीचे दर भविष्यात वाढणार आहेत. पेट्रोलियम पदार्थ विशेषत: इंधनाचे दर वाढल्यामुळे आजच वाहतूकदारांनी आम्हाला दर वाढवून देण्याची मागणी केली आहे. लक्ष्मी हायड्रॉलिक्सच्या उत्पादनामध्ये कॉपर वायरचा ४० टक्के वापर केला जातो. ही वायर आम्हाला आयातच करावी लागते. रूपयाचे अवमूल्यन झाल्यामुळे कॉपर वायर आता प्रती टन ५ लाख रूपयांनी महागली आहे. कंपनीकडून निर्यात कमी असल्यामुळे अवमूल्यनाचा फारसा लाभ होत नाही, असेही ते म्हणाले.

विविध आजारांवरील औषधे आणि अन्य कारणांसाठी लागणारे अमाईन्सचे उत्पादन करण्यात आघाडीवर असलेल्या बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी म्हणाले की, आम्हाला कच्च्या मालाची वर्षाला २०० ते २५० कोटी रूपयांची आयात करावी लागते. रूपया घसरल्यामुळे अमाईन्स बनविण्यासाठी लागणाºया सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. आयातीच्या तुलनेत ‘बालाजी’ची निर्यात केवळ १५० कोटी रूपयांची आहे. रूपयाच्या घसरणीचा विचार करता आम्ही निर्यात वाढविण्यासाठी योजना आखल्याचेही ते म्हणाले.प्रिसिजन कॅमशाफ्ट्स ही सर्वप्रकारच्या चारचाकी आणि बहुचाकी वाहनांना लागणाºया कॅमशाफ्ट्सची निर्मिती करण्यात जगातील तिसºया क्रमांकाची कंपनी आहे. ‘प्रिसिजन’चे जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे म्हणाले की, प्रिसिजन एकूण उत्पादनाच्या ८५ टक्के म्हणजेच ४५० कोटी रूपयांची निर्यात करते. सध्याच्या रूपया घसरणीच्या काळात जी निर्यात होते, त्याचा लाभ कंपनीला नक्कीच होत आहे; पण या काळात मशिनरीची आयात करावी लागते. आवश्यकतेनुसार ती आजही परदेशातून खरेदी केली जाते. हे दर मात्र वाढलेले आहेत. शिवाय फौंड्रीसाठी वापरण्यात येणाºया सँडमध्ये पेट्रोकेमिकल्सचा वापर असतो. रूपया घसरल्यामुळे ही सँड किलोमागे ५० पैशांनी महाग झाली आहे, असे त्यांनी सांगितले.

निर्यात वाढविणारे धोरण हवे!रूपयाच्या अवमूल्यनामुळे उद्योग क्षेत्रासाठी लागणाºया कच्च्या मालाच्या दरात भरमसाठ वाढ झाली. शिवाय इंधनाचे दरही वाढलेले आहेत. सरकारने निर्यात वाढविणारे धोरण आखणे गरजेचे असून, शहरात मिळणाºया पेट्रोलवर लावण्यात आलेला ९ रूपयांचा अधिभार राज्य सरकारने कमी केला पाहिजे. याशिवाय वस्तू आणि सेवा करामध्ये सरकारला १ लाख १५ हजार कोटी रूपयांचा लाभ झाला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे २६ टक्के व २४ टक्के असणारा मूल्यवर्धित कर कमी करावा, अशी मागणी सोलापूर चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी यांनी केली आहे.

अवमूल्यनाचे परिणामअमेरिकन डॉलरच्या तुलनेत रूपयाची दररोज घसरण सुरू असून, सप्टेंबरअखेरपर्यंत एका डॉलरचा दर ७२ रूपयांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आॅगस्ट महिन्याच्या सुरूवातीला ६८.४६ रूपये असलेला डॉलरचा दर आता ७१ रूपयांपर्यंत आला आहे. याचे सोलापूरच्या उद्योग क्षेत्राला लागणाºया वस्तूंचे दर असे वाढलेले आहेत.

 

टॅग्स :Solapurसोलापूरbusinessव्यवसायInflationमहागाई