- रवींद्र देशमुख सोलापूर - बचत गटाचे सर घरी आले आहेत असे सांगत पीडित महिलेला घरी बोलवून तिचा हात ओढला. तिला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी तरुणावर विनयभंगाचा व ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सर्फराज तांबोळी, आफरीन तांबोळी ( रा. किसन नगर) यांच्यावर सोलापुरात गुन्हा दाखल झाला आहे.
पीडित ही घरात असताना आरोपी आफरीन हिने तिला बचत गटाचे सर आले आहेत, असे म्हणत घरी बोलवले. फिर्यादी त्यांच्या घरी गेल्यानंतर तेथे बचत गटाचे सर न दिसल्याने फिर्यादींनी विचारणा केली. त्यावेळी आरोपी सर्फराज याने पीडितेचा हात ओढत तिला लज्जा वाटेल असे कृत्य केले. शिवाय त्यांना मारहाण केली. त्यावेळी पीडितेचा मुलगा हा मध्यस्थी आल्यानंतर आरोपीने जातीवाचक शिवीगाळ केली. तर आरोपी आफरीन हिने खाली पाडून मारहाण केली, अशा आशयाची फिर्याद पीडितेने दिली आहे. या फिर्यादीवरून वरील दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलिस करत आहेत.