आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ८ : नुकताच केंद्र सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये सोलापूर मध्य रेल्वे मंडळातील विविध कामांसाठी ९०६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये जुनी प्रलंबित कामे निकाली काढण्यासाठी जास्तीत जास्त ८०२ कोटी तर नवीन कामांसाठी १०४ कोटी मंजूर करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे सोलापूर विभागाचे रेल्वे प्रबंधक हितेंद्र मल्होत्रा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. दौंड-मनमाड या दुहेरीकरणाच्या कामासाठी २१० कोटी रुपयांची तरतूद झाली आहे. याशिवाय अहमदनगर-बीड-परळी या २५० कि. मी. अंतराच्या कामासाठी ४२५ कोटी मिळाले आहेत. या बजेटमध्ये प्रथमच पंढरपूर-फलटण, जेऊर-आष्टीसाठी नवीन लाईन टाकण्यासाठी निधी मंजूर झाला आहे. सोलापूर विभागामध्ये एकूण २६९ क्रॉसिंग लाईनचे फाटक आहेत. यातील ११४ फाटक बंद करण्यात आले आहेत. यावर्षी २७ फाटक बंद करायचे आहेत. तीन वर्षात लेव्हल क्रॉसिंग बंद करण्याचा आराखडा तयार केला आहे. चालू वर्षी या कामासाठी १३ कोटी मंजूर झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यात तीन क्रॉसिंग फाटक बंद करण्यात येणार असल्याचे मल्होत्रा यांनी स्पष्ट केले.जुन्या झालेल्या रेल्वे ट्रॅकच्या नूतनीकरणासाठी ९० कोटी या वर्षासाठी मंजूर झाले आहेत. १०० वर्षांपासून असलेल्या जुन्या १९ छोट्या पुलांच्या दुरुस्तीसाठी २.७ कोटी मिळाले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील वाकाव- माढा-वडशिंगे या १५ कि. मी. मार्गाचे दुहेरीकरण या वर्षात पूर्ण होणार आहे. पुढच्या वर्षी २०१९ मध्ये वडशिंगे, भाळवणी, बोराटी-कुलाली, गुलबर्गा-गाणगापूर या एकूण ८३ कि. मी. अंतरावरील डबलिंग (दुहेरीकरण)चे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. उर्वरित कामे मार्च २०२० पर्यंत पूर्ण होतील. प्रवाशांना दर्जेदार सुविधा पुरवण्यासाठी या अर्थसंकल्पात तरतूद केली असून वॉटर रिसायकलिंग प्रकल्प यापूर्वीपासूनच सोलापूर येथे सुरू आहे. सांडपाण्यातून दररोज ३.५ लाख लिटर पाणी पुन्हा वापरात आणले जात आहे. सोलापूर आणि दौंड येथे पाणी साधन यंत्राचे काम सुरू आहे. यापूर्वीच मंजूर असलेली कामे तातडीने पूर्ण व्हावीत, या अनुषंगाने केंद्राने या बजेटमध्ये जादा तरतूद केली आहे. दुहेरीकरणासाठी प्रलंबित असलेले सोलापूर-अक्कलकोट, सोलापूर-वाकाव आणि दौंड-भिगवण ही कामे पूर्ण झाल्यानंतरच नव्या गाड्या सुरू करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील, असे मल्होत्रा यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेस सहा. रेल्वे प्रबंधक व्ही. के. नागर, वरिष्ठ अभियंता गौतम कुमार, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आर. के. शर्मा यांची उपस्थिती होती.-------------------सोलापूरसह आठ स्टेशनवर सरकते जिनेसोलापूरसह आठ रेल्वे स्टेशनवर १९ सरकते जिने कार्यान्वित करण्यासाठी केंद्राने निधी मंजूर केला आहे. यात सोलापूरसाठी ३, कुर्डूवाडी ३, दौंड ३, गुलबर्गा २, कोपरगाव २, पंढरपूर २, लातूर २, शिर्डीसाठी २ असा समावेश आहे. वेळेत पायाभूत सुविधा मिळाल्यास मार्च २०१९ पर्यंत ही कामे पूर्ण होतील, असा विश्वास रेल्वे प्रबंधकांनी व्यक्त केला. मोठ्या स्टेशनवर प्रत्येकी १५ सीसीटीव्ही कॅमेरे- सोलापूर रेल्वे स्टेशनवर यापूर्वीच सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. याशिवाय आणखी १५ कॅमेरे मंजूर झाले आहेत. याच विभागातील अहमदनगर, दौंड, गुलबर्गा, कोपरगाव, कुर्डूवाडी रेल्वे स्टेशनवर हे कॅमेरे बसवण्यात येतील. रेल्वे वाडी-गुलबर्गा या ३८ कि. मी. अंतरावरील विद्युतीकरणाचे काम पूर्णत्वास आले आहेत.
अर्थसंकल्पात सोलापूर मध्य रेल्वेला मिळाले ९०६ कोटी, जुनी कामे निकाली काढण्यासाठी ८०२ कोटी; हितेंद्र मल्होत्रा यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 12:37 PM
नुकताच केंद्र सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये सोलापूर मध्य रेल्वे मंडळातील विविध कामांसाठी ९०६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
ठळक मुद्देजुनी प्रलंबित कामे निकाली काढण्यासाठी जास्तीत जास्त ८०२ कोटीनवीन कामांसाठी १०४ कोटी मंजूरसोलापूरसह आठ रेल्वे स्टेशनवर १९ सरकते जिने कार्यान्वित करण्यासाठी केंद्राने निधी मंजूर केलामोठ्या स्टेशनवर प्रत्येकी १५ सीसीटीव्ही कॅमेरे