शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! IPS रश्मी शुक्ला पुन्हा महाराष्ट्राच्या DGP बनल्या, निवडणूक काळात काँग्रेसच्या तक्रारीवरून पदावरून हटवले होते
2
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
3
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
4
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
5
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!
6
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
7
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
8
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
9
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
11
वॉरेन बफेट यांनी आपला उत्तराधिकारी ठरवला, दान केले १.१ अरब अमेरिकी डॉलरचे शेअर
12
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
14
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
15
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
16
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
17
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
18
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
19
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
20
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई

Solapur: सोलापुरातील कामगारांच्या मुलांनी हजारो पक्ष्यांसाठी बनवली पाणपोई; टाकाऊपासून टिकाऊचा अवलंब

By appasaheb.patil | Published: February 28, 2023 1:51 PM

Solapur: देवराज प्राथमिक शाळा पक्ष्यांच्या पाणपोईसाठी सरसावली असून येथील शिकणाऱ्या कामगारांच्या विद्यार्थ्यांनी टाकाऊ पासून टिकाऊ या पद्धतीचा अवलंब करत पक्ष्यांसाठी पाणपोई उभारली आहे.

- आप्पासाहेब पाटीलसोलापूर : उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत.सोलापुरात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. असत मुक्या प्राणी-पक्ष्यांचे हाल सुरू झाले असून पाण्यावाचून त्यांची तडफड होऊ नये,यासाठी हद्दवाढ भागातील देवराज प्राथमिक शाळा पक्ष्यांच्या पाणपोईसाठी सरसावली असून येथील शिकणाऱ्या कामगारांच्या विद्यार्थ्यांनी टाकाऊ पासून टिकाऊ या पद्धतीचा अवलंब करत पक्ष्यांसाठी पाणपोई उभारली आहे.

लहान मुले म्हणजे देवाघरची फुले या उक्तीप्रमाणे देवराज प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी माणुसकीचे दर्शन घडवत पक्ष्यांसाठी पाणवठा तयार केले आहे.प्लास्टिकच्या बाटल्या,डाबण,सुतळी,विटा आदी साहित्यांचा वापर करून विद्यार्थ्यांनी शाळेतील खिडक्यांमध्ये,झाडांमध्ये व सुरक्षित ठिकाणी या पक्ष्यांसाठी पाणवठे निर्माण केले आहेत. यामुळे या ठिकाणी पक्ष्यांची गर्दी होताना दिसत आहे.पशु-पक्षी हे राष्ट्राचे संपत्ती आहेत आणि त्यांचे जतन होणे ही काळाची गरज असून त्या दृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम राबवल्याचे मुख्याध्यापिका आशाराणी डोके यांनी सांगितले.

उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विश्वनाथ बिराजदार,प्रफुल्लकुमार पाटील, शंभुलिंग अकतनाळ,स्वाती म्याकल,विनोद माशाळे,महेश कुंभार,जयंत गायकवाड, मळसिद्ध केवटे, निश्चलदास म्हेत्रे, पद्मसिंह व्हरडे, प्रसाद साळुंखे, शशिकला सातपुते, वंदना लचमापुरे, मल्लिनाथ अचलेरकर प्रशांत यादव, चंद्रकला कांबळे, निता कटारे, गंगुबाई कुलकर्णी यांच्यासह शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.  या माणुसकीच्या उपक्रमाचे संस्थापक नागनाथ सुरवसे, उपाध्यक्ष डॉ.श्रीपाद सुरवसे, सचिव संजीवनी पडवळकर, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सारिका माने, सागर सुरवसे, चैताली जुगदार आदींनी कौतुक केले आहे

चिमुकले मुक्या पक्ष्यांसाठी दररोज साठवतात पाणी..या शाळेत शिकणारी बहुतांश मुले ही कामगार वर्गातील आहेत. त्यांना पाण्याचे महत्व अनमोल असल्याचे कळते म्हणूनच मुक्या पक्ष्यांसाठी दररोज शाळा सुटल्यानंतर वॉटरबॅग मधील उरलेले पाणी या पाणवठ्यात साठवण्यासाठी चिमुकले धडपडत असताना या ठिकाणी दिसत आहेत.

टॅग्स :Studentविद्यार्थीSolapurसोलापूर