सोलापूर: औज बंधाऱ्यातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. या बंधाऱ्यात सध्या मुबलक पाणी आहे, काही दिवसात उजनीतून सोडण्यात आलेले पाणीही येणार आहे. हे पाणी संपूर्ण उन्हाळा संपेपर्यंत वापरायचं आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांकडून पाणी उपसा होऊ नये यासाठी वीज पुरवठा खंडित करावा, याबाबत सोलापूर व विजयपूर जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे कळविले आहे.
येत्या २० मार्च रोजी उजनीतून औज बंधाऱ्यात पाणी सोडण्याचे रोटेशन आहे. दरम्यान ९ मार्चपर्यंत तेथील पाणी संपेल असा अंदाज होता. मात्र महापालिकेच्या अधिकार्यांनी डोहामधून पाणी आणून त्याचाच वापर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे आवश्यकतेनुसार पाणी आहे. येत्या २० मार्च रोजी पाणी रोटेशन सोडण्यात येईल. यामुळे औज बंधारा परिसरातील शेतकऱ्यांकडून पाणी पाणी उपसा होऊ नये यासाठी वीज पुरवठा खंडित करावा याबाबत सोलापूर व विजापूर जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे कळविले आहे, असेही आयुक्तांनी सांगितले.