शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

सोलापूर शहर पोलीस दल; ‘खाकी’वर्दीतला ‘देव’ आला धावून

By admin | Published: March 27, 2017 12:28 PM

सोलापूर शहर पोलीस दल; ‘खाकी’वर्दीतला ‘देव’ आला धावून

सोलापूर शहर पोलीस दल; ‘खाकी’वर्दीतला ‘देव’ आला धावूनसोलापूर : आप्पासाहेब पाटीलगुरुवारी सायंकाळी पाचची वेऴ़़ विजापूर रस्त्यावरील धर्मवीर संभाजीराजे तलावाजवळील रेल्वे उड्डाण पुलाजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होते. यातएक युवकसह ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर विव्हळत पडलेले. हे पाहून तेथून जाणाऱ्यांची गर्दी जमते, पण त्यांना मदतीचा हात कोणीच देईना. इतक्यात कोणी तरी पोलीस कंट्रोलला फोन केल्यावर चोवीस तास गस्तीवर असणारी कंट्रोलची व्हॅन सायरन वाजवत तेथे येते व गाडीतून उतरलेले पोलीस मागचा पुढचा विचार न करता गाडीतून स्ट्रेचर काढून जखमींना शासकीय रुग्णालयात हलवतात. येथेही डॉक्टर संपावर कर्मचाऱ्यांची मदत नाही. पोलिसांनीच जखमींना तातडीच्या वैद्यकीय विभागात उचलून नेल्याने त्या जखमींचे प्राण वाचले. गस्ती पथकाच्या गाडीला कंट्रोल रूमचा निरोप, काही वेळातच सायरन वाजवत पोलीस व्हॅन येते़़़पोलीस व्हॅन नव्हे जणू अ‍ॅम्ब्युलन्सच़़़तेवढ्याच अदबीने वयस्कर पोलीस काका स्ट्रेचर घेतात़़़सायरन वाजवत काही क्षणात गाडी शासकीय रुग्णालयात पोहोचते़़़एकीकडे डॉक्टरांचा संप अन् दुसरीकडे ओपीडीचे कोणीच कर्मचारी भेटत नाहीत़़़येथे ‘खाकी’मधला देव जागा होतो़़़पुन्हा पोलीसच स्ट्रेचर आणतात़़़ओपीडीत उपचारासाठी दाखल करतात़़़जखमींची समजूत घालतात आणि विव्हळत असलेल्या अपघातातील रूग्णास बळ देतात़ही करुण कहाणी आहे सदर बझार पोलीस ठाण्यातील पोलिसांची़ त्याचे झाले असे, गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास धर्मवीर संभाजीराजे तलावाजवळील सय्यद बुखारी दर्गाहजवळ हिरोगिरी करीत आलेल्या प्रज्योत रमेश हेगाडे (वय १९, रा़ विजापूर रोड, सोलापूर) या दुचाकीस्वाराने अशोकलाल मदनलाल सोनी (वय ६७, रा़ दक्षिण सदर बझार, जगदंबा चौक, सोलापूर) या ज्येष्ठ नागरिकाच्या मोटरसायकलला जोराची धडक दिली़ या धडकेत अशोकलाल सोनी हे खाली पडून जखमी झाले़ या अपघातानंतर रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली़ त्यातील एकाने शहर पोलीस कंट्रोल रूमला कळविले़ त्यानंतर काही वेळात गस्ती पथकातील पोलीस व्हॅन व पोलीस अधिकारी, कर्मचारी तत्काळ जागेवर दाखल झाले़ अन् कोणत्याही रुग्णवाहिका व इतर वाहनाची वाट न पाहता आपल्याकडे असलेल्या गस्ती पथक पोलीस व्हॅनमध्ये जखमीस घेऊन उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले़ ही पोलीस व्हॅन अपघातातील जखमीस घेऊन जणू अ‍ॅम्ब्युलन्सप्रमाणेच शासकीय रुग्णालयात आली़ त्यानंतर तेथेही रुग्णालयातील कोणीच मदत करणारे उपलब्ध नव्हते़ त्यामुळे मदतीसाठी धावून आलेल्या पोलिसांनीच जखमीस अपघात विभागात दाखल केले़ त्यानंतर संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना उपचारासाठी मदतही केली़ ----------------हे आहेत खाकीतले देवमाणूससहा़ पोलीस निरीक्षक : विलास रामचंद्र नरोटेपोलीस हेडकॉन्स्टेबल : पुरूषोत्तम पंडित कुलकर्णीपोलीस हेडकॉन्स्टेबल : शरद ज्ञानोबा बंगाळेपोलीस कॉन्स्टेबल (चालक) : दिगंबर भीमराव जाधव़---------------------पोलीस व्हॅन धावली रूग्णवाहिकेसारखी़़़एकीकडे डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णावर उपचार करण्यासाठी डॉक्टर मिळणे मुश्कील झाले आहे़ त्यात रूग्णवाहिका मिळणे फारच दूऱ मात्र सदर बझार पोलीस ठाण्याच्या या देव माणसांनी कोणत्याही रूग्णवाहिका व खासगी वाहनांची प्रतीक्षा न करता आपल्या पोलीस व्हॅनमध्येच बसवून जखमींना उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल केले़ अपघातातील रूग्णांना वेळेत उपचार न झाल्यास काय परिस्थिती होते, हे कोणाला सांगायला नको़ मात्र पोलिसांच्या मदतीने एका अपघातग्रस्तावर वेळेत उपचार होणे हे क्वचित पाहावयास मिळाले़---------------आम्ही महावीर चौकातून सात रस्त्याकडे येत होतो़ त्यावेळी कंट्रोल रूमवरून धर्मवीर संभाजीराजे तलावाजवळ अपघात झाल्याची माहिती सांगण्यात आली़ त्यानंतर आम्ही लगेच घटनास्थळाला भेट देऊन जखमींना उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल केले़ अपघात कसा झाला, कोणाची चूक होती हे पाहण्यापेक्षा जखमीस वेळेत उपचार सुरू होणे महत्त्वाचे होते म्हणून तत्काळ शासकीय रूग्णालय गाठले़- विलास नरोटेसहा़ पोलीस निरीक्षक, सदर बझार पोलीस ठाणे, सोलापूऱ