शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

Solapur: धोकादायक वळणावर भरधाव दुचाकी भिंतीवर आदळली, महाविद्यालयीन तरुणाचा जागीच मृत्यू ‌, मित्र जखमी

By काशिनाथ वाघमारे | Published: June 15, 2023 8:30 PM

Solapur: पंढरपूर येथून विठ्ठलाचे देवदर्शन आटपून घराकडे येताना भरधाव दुचाकीचा धोकादायक वळणावर ताबा सुटला आणि मोटरसायकल मंदिराच्या भिंतीवर जाऊन आदळली.

- काशिनाथ वाघमारे सोलापूर - पंढरपूर येथून विठ्ठलाचे देवदर्शन आटपून घराकडे येताना भरधाव दुचाकीचा धोकादायक वळणावर ताबा सुटला आणि मोटरसायकल मंदिराच्या भिंतीवर जाऊन आदळली. या भीषण अपघातात महाविद्यालयीन तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा महाविद्यालयीन मित्र गंभीर जखमी झाला. त्याच्यावर पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

हा अपघात बुधवारी रात्री १० च्या सुमारास सांगोला तालुक्यात जवळा - घेरडी रस्त्यावर तरंगेवाडी येथे घडला. आंबेश्वर गुरुलिंग शेरखाने (वय २२) असे जागीच मरण पावलेल्या तरुणाचे नाव असून राहूल संजय सुतार (वय २३, दोघेही रा.घेरडी, ता. सांगोला) असे जखमी मित्राचे तरुणांचे नाव आहे.

दरम्यान बुधवारी सकाळी दोघेजण मिळून आंबेश्वरच्या दुचाकीवरून पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी गेले होते. दरम्यान देवदर्शन आटोपून दुचाकीवरून सांगोल्यात येवून दोघांनी मिळून जेवण केले. त्यानंतर दुचाकीवरून रात्री १० च्या सुमारास सांगोला-जवळा ते घेरडी रोडने जात असताना आंबेश्वरचा भरधाव दुचाकीचा तरंगेवाडी येथील धोकादायक वळणावर ताबा सुटला. दुचाकी सरळ रस्त्यालगत मंदिराच्या भिंतीला जाऊन धडकली. अपघातात आंबेश्वर शेरखाने याच्या डोक्यासह हाता पायाला गंभीर मार लागल्याने तो जागीच ठार झाला.

रासपचे पदाधिकारी धाऊन आले...अपघातानंतर मित्र राहुल सुतार हा जखमी अवस्थेत त्याच ठिकाणी विव्हळत पडून होता. दरम्यान नेमके त्याचवेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सोमा मोटे हे त्याच रस्त्याने कारमधून जात होते. त्यांनी अपघात झाल्याचे पाहून माहिती मृत व जख्मींच्या नातेवाईकांना दिली. जखमी राहुल सुतार यास पुढील उपचारा करता पंढरपूरला दाखल करण्यास मदत करुन माणुसकी दाखवल्यामुळे राहुल याचे प्राण वाचले. दरम्यान या अपघाताची गुरुवारी रात्री उशिरापर्यंत पोलिसात नोंद झालेली नव्हती.

तो बीएस्सीला होता, हा वखार चालवायचाआंबेश्वर शेरखाने हा सांगोला महाविद्यालयात बीएस्सीच्या तृतीय वर्षाचे शिक्षण घेत होता तर त्याचा मित्र राहुल सुतार हा गावातच लाकडाची वखार चालवत होता. दरम्यान गुरुलिंग शेरखाने पती-पत्नी शिक्षकांचा एकुलता एक मुलगा आंबेश्वर याचे अपघाती निधन झाल्याने शेरखाने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.

टॅग्स :AccidentअपघातSolapurसोलापूर