ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. २५ - विनापरवाना सावकारी करणा-या पाच जणांविरुध्द शहरातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई २४ आॅगस्ट रोजी करण्यात आली. सहकार कार्याधिकारी राहुल रंगराव ठोंबर यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी रमेश उमाशंकर जानकी (रा. विडी घरकुल) याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
दत्तात्रय शहाजी भंबर यांनी जोडभावीपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी तेजस्वीनी राजू सरवदे (रा.भवानी पेठ) याच्या विरुध्द गुन्हा दाखल. ठोंबरे यांच्या फिर्यादीवरुन जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात लक्ष्मी बुध्दघोश सरवदे (रा.बुधवार पेठ) याच्या विरुध्द सावकारी अधिनियमा प्रमाणे गुन्हा. तुषार पांडुरंग कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन व्यंकटेश म्याडम (रा . घोंगडेवस्ती जोडभावी) याच्यावर गुन्हा. दत्तात्रय शहाजी भंवर यांच्या फिर्यादीवरुन व्यंकटेश मोहन मार्गम (रा.१३९ रेल्वे लाईन सोलापूर जोडभावी) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपीने सहकारी खात्याच्या वैध्य परवानगी शिवाय बेकायदेशिर सावकारी व्यवसाय करुन लोकांकडून कोरे स्टँप चेक नोंद वह्या ज्यामध्ये मुदलाच्या रक्कमा व व्याजाचा तपशील मिळून आल्याचे फिर्यादीत म्हटंले आहे. या घटनेचा अधिक पोलीस करत आहेत.