सोलापूर : कुंभारी येथे पैशाच्या कारणावरून वडील अंबादास सुरवसे याने कुºहाड डोक्यात मारून मुलगा विश्वनाथ सुरवसे याचा खून केल्याची घटना सोलापूरात उघडकीस आली आहे़
स्वाती कांबळे (वय २१, रा. महालक्ष्मी नगर , मजरेवाडी) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी आरोपी वडील अंबादास सुरवसे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
मयत विश्वनाथ हा त्याच्या कामाच्या पैशातून बचत करत होता. त्या पैशातून तो बहिणीला किराणा दुकान टाकून देण्यासाठी त्याने ४० हजार रुपये जमा केले होते. आणखी काही पैशासाठी वडिलांकडे मागणी केली असता त्यांनी नकार दिला. सारे झोपलेले असताना वडिलांनी मयत विश्वनाथवर कुºहाडीने हल्ला केला. आरडाओरडा झाल्याने घरातील सर्वजण जागे झाले. दरम्यान आरोपी पळून गेला. विश्वनाथ याचा खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अधिक तपास सहा. पोेलीस निरीक्षक रमेश चिंताकिंदी करीत आहेत.
बहिणीस दुकान थाटण्याचे ठरले निमित्तच्फिर्यादी ही मयत विश्वनाथची बहीण आहे. पती प्रकाशच्या निधनामुळे ती माहेरी राहत होती. मयत विश्वनाथने बहिणीच्या उपजीविकेसाठी किराणा दुकान सुरू करण्यासाठी वडिलांकडे पैैसे मागितले. यातूनच वडिलांनी विश्वनाथाचा खून केल्याचे फिर्यादित म्हटले आहे.