सोलापूर : एकरकमी परतफेड योजनेंतर्गत जिल्ह्यातील २८०६ शेतकºयांनी दीड लाखावरील १३ कोटी ३ लाख १२ हजार ३४१ रुपये इतकी रक्कम भरल्याने शासनाकडून ३३ कोटी ३२ लाख ६८ हजार २४९ रुपये मिळाले आहेत. यामुळे जिल्हा बँकेची ४६ कोटी ३५ लाख ८० हजार ५८९ रुपये इतकी वसुली झाली आहे.
राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकºयांची कर्जमाफी केली आहे. यामध्ये थकबाकीदारांना सरसकट दीड लाख रुपयांचा फायदा दिला जाणार असल्याने दीड लाखावरील रक्कम शेतकºयांनी भरावयाची आहे. ३१ मार्चपर्यंत दीड लाखावरील रक्कम शेतकºयांना भरण्याची अंतिम मुदत शासनाने दिली आहे. जिल्हा बँकेच्या २१७ शाखांमध्ये विकास सोसायट्यांमार्फत दीड लाखावरील रक्कम भरणा करुन घेतली जात आहे.
शनिवारी रात्री उशिरापर्यंत भरणा करुन घेण्याचे काम सुरू होते. दीड लाखावरील पात्र १६ हजार २२७ शेतकºयांपैकी २८०६ पात्र शेतकºयांनी सायंकाळपर्यंत भरणा केला होता. या शेतकºयांनी १३ कोटी ३ लाख १२ हजार ३४१ रुपयांचा भरणा केला असल्याने शासनाने दीड लाखाप्रमाणे ३३ कोटी ३२ लाख ६८ हजार २४९ रुपये जमा केले आहेत. जिल्हा बँकेची ओटीएसच्या रुपाचे ४६ कोटी ३५ लाख ८० हजार ५८९ रुपये वसुली झाली आहे.
मंगळवेढ्याचे अवघे ८५ खातेदार- मंगळवेढ्याच्या पात्र ७६६ पैकी ८५ शेतकºयांनीच रक्कम भरणा केली आहे़ बार्शीच्या ६६१, करमाळ्याच्या ५९६, माढ्याच्या ३३२, उत्तर तालुक्यातील २२९, मोहोळच्या २२४, दक्षिण तालुक्यातील १६७, पंढरपूरच्या १५२, सांगोल्याच्या १२६, अक्कलकोटच्या १२०, माळशिरसच्या ११४ याप्रमाणे २८०६ शेतकºयांनी पैसे भरल्याने कर्जमुक्त झाले आहेत.
कर्जमुक्त होण्याची शेतकºयांना ही संधी आहे. १६ हजार २२७ शेतकºयांना यात भाग घेता येत असून शेतकºयांनी दीड लाखावरील पैसे भरावेत. दीड लाखाची शासनाकडून रक्कम आलेली आहे.- राजन पाटीलअध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँक