शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

सोलापूर जिल्ह्यात  ३०४ गावांत ‘एक गाव एक गणपती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2018 12:08 PM

यंदा जिल्ह्यातील ३०४ गावांमध्ये एकच गणराय विराजमान होणार

ठळक मुद्देजिल्ह्यात २ हजार ७५१ गणपतीची प्रतिष्ठापना होणारमागील वर्षी २ हजार ७२० श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली प्रत्येक गावात पोलीस उपविभागीय अधिकारी व पोलीस निरीक्षक यांच्या बैठका

सोलापूर : जिल्ह्यातील सर्व गावकरी मिळून एकच गणपती बसवून गावामध्ये एकोपा निर्माण करत आहेत. ‘एक गाव एक गणपती’ या संकल्पनेनुसार यंदा जिल्ह्यातील ३०४ गावांमध्ये एकच गणराय विराजमान होणार आहेत.तर जिल्ह्यात २ हजार ७५१ गणपतीची प्रतिष्ठापना होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने देण्यात आली. 

गावांमध्ये गणेशोत्सव काळात गट-तट निर्माण होऊन वाद निर्माण होतात. त्यातून गावातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना गेल्या काही वर्षांपासून राबविण्यात येत आहे. पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावांमध्ये ही योजना राबविण्यात येते. पोलीस स्टेशनमार्फत हद्दीतील गावांमध्ये बैठक घेऊन ‘एक गाव एक गणपती’ संदर्भात प्रबोधन करण्यात आले. त्यानुसार यंदा जिल्ह्यातील तीस पोलीस स्टेशनच्या हद्दीपैकी २५ पोलीस स्टेशन हद्दीतील ३०४ गावांमध्ये एकच गणपती बसविण्यात येणार आहे. मागील वर्षी २ हजार ७२० श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. तसेच ३३४ गावात ‘एक गाव एक गणपती’ योजना राबविण्यात आली होती.

प्रत्येक गावात पोलीस उपविभागीय अधिकारी व पोलीस निरीक्षक यांच्या बैठका होत आहेत. त्यात गणेश मंडळांना डॉल्बीचा वापर करू नये असे आवाहन करण्यात येत आहे. शिवाय डॉल्बीधारकासोबत पोलीस अधिकाºयांनी बैठका घेतल्या आहेत. गणेश मंडळाकडून कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, गणेशोत्सव परवाना,शिस्त, नियम व कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने विविध उपाययोजनांबाबत ग्रामीण पोलिसांच्या वतीने  शांतता कमिटीच्या बैठकांच्या माध्यमातून गणेश मंडळातील पदाधिकाºयांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.

डॉल्बीमुक्तीसाठी विशेष प्रयत्न- जिल्ह्यात सर्वच गावातील गणेशोत्सवावर होणारा मोठा खर्च टाळण्यासाठी ‘एक गाव एक गणपती’बरोबर डॉल्बीमुक्तीसाठी ग्रामीण पोलीस प्रयत्न करत आहेत. त्याला प्रोत्साहन मिळत असून गणेश मंडळांनी डॉल्बीऐवजी पारंपरिक वाद्याचा वापर करावा असे आवाहन ही करण्यात आले आहे. गणेश मंडळांना बक्षीस देणार - यंदा गणेश मंडळांनी वर्गणीतून वृक्ष लागवड,  समाज, शिक्षणासाठी खर्च करावा. अशा गणेश मंडळांना बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यांकडून तीन तर पोलीस उपविभागीय कार्यालयाकडून दोन बक्षीस गणेश मंडळांना देण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.

तीन तालुक्यांत मोठ्या मिरवणुका १३ ते २३ आॅगस्ट या कालावधीत जिल्ह्यात गणेश उत्सव साजरा होणार आहे. श्री गणेश विसर्जनाच्या मिरवणुकाया पाचव्या दिवसांपासून सुरु होतात. २३ आॅगस्ट हा गणेश विसर्जनाचा मुख्य दिवस आहे. सोलापूर ग्रामीण भागात बार्शी,अक्कलकोट व पंढरपूर या ठिकाणी गणेश विसर्जनाच्या मोठ्या मिरवणुका काढल्या जातात.

धर्मादाय आयुक्तांची परवानगी आवश्यकगणेश मंडळांनी वर्गणी गोळा करण्यासाठी धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यांची परवानगी नसेल तर वर्गणी गोळा करता येणार नाही. जर असे कोणी केले तर संबंधित गणेश मंडळांवर कारवाई करण्यात येणार आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरGaneshotsavगणेशोत्सवSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसPoliceपोलिस