लोकमत न्यूज नेटवर्कसोलापूर : महाराष्ट्र शिक्षण विभागाने कला व क्रीडा शिक्षकांच्या तासिका कमी केल्या होत्या़ संबंधित शिक्षक संघटनांचे आंदोलन आणि पाठपुराव्यानंतर त्यांच्या तासिका पूर्ववत करण्याचा निर्णय जाहीर केला़ मात्र या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात शाळांनी चालढकल सुरू केली आहे़ बोटांवर मोजण्याइतक्या शाळा वगळता जिल्ह्यातील बहुतांश शाळांनी शिक्षणमंत्र्यांच्या निर्णयाला केराची टोपली दाखवल्याने कला-क्रीडा शिक्षकांवरील टांगती तलवार अद्याप हटलेली नाही़ सन २०१७-१८ यास वर्षाच्या सुरुवातीला महाराष्ट्र शिक्षण विभागाने कला व क्रीडा शिक्षकांच्या तासिका कमी केल्या होत्या़ त्या विरोधात कला-क्रीडा शिक्षक संघटनांकडून जोरदार विरोध झाला़ शिक्षणमंत्री आणि संघटनांची बैठक घेऊन कला-क्रीडाच्या तासिका पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला़ विद्या प्राधिकरणाने ५ आॅक्टोबर २०१७ रोजी सुधारित वेळापत्रकाचे नियोजन प्रसिद्ध केले़ दिवाळीनंतर सुरू होणाºया दुसºया सत्रात बदललेले वेळापत्रक शाळेने तयार करून त्याप्रमाणे तासिके चे नियोजन करण्याचे आदेश दिले़ संबंधित आदेशाची प्रत सांकेतिक स्थळावरून सर्व शाळांना अधिकृतपणे कळवून आणि आदेश होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी बोटांवर मोजण्याइतक्या शाळा सोडल्या तर बहुतांश शाळांनी सुधारित वेळापत्रकांची अंमलबजावणाी करण्यात चालढकल केली आहे़ बºयाच शाळांशी जिल्हा शैैक्षणिक कला शिक्षक संघाने संपर्क साधला असता जिल्हा मुख्याध्यापक संघाचे परिपत्रक आल्यावर नवीन वेळापत्रक तयार करू असे सांगून वेळ मारून नेत आहेत़ संघटनांचे पदाधिकारी या संदर्भात सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघटनेला विचारले असता हा विषय आमच्या अखत्यारीखाली येत नसल्याचे सांगितले जाते़ कोणतीही शाळा मुख्याध्यापक संघाला बांधील नसून शासनाला बांधील आहे़ अशावेळी आमच्या परिपत्रकाची अपेक्षा क रणे चुकीचे आहे, असे मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी सांगतात़ ------------------मोजक्याच शाळांकडून अंमलबजावणी- जीवनज्योत प्रशाला, कंदलगाव (दक्षिण सोलापूर)- समता हायस्कूल, सावळेश्वर (ता़ मोहोळ)- नागनाथ विद्यालय (मोहोळ)- जागृती विद्यामंदिर (नेहरू नगर, सोलापूर)- के. बी़ विद्यालय (कपिलपुरी)- रामभाऊ जोशी हायस्कूल, करकंब (पंढरपूर)- सिद्धेश्वर हायस्कूल (सोलापूर)---------------शिक्षणमंत्र्यांचा निर्णय महत्त्वाचा आहे़ सुधारित वेळापत्रकाची अंमलबजावणी करण्यास कोणत्याच शाळेला अडचण नाही़ तरी याबाबत आपण शाळांना आणि मुख्याध्यापक संघाला याबाबत बोलणार आहोत़ शाळांनी सुधारित वेळापत्रकाची अंमलबजावणी करायला काहीच हरकत नाही़- सत्यवान सोनवणे , शिक्षणाधिकारी------------------------या साºया गोंधळात विद्यार्थ्यांना कलेचा आणि खेळाचा आनंद घेता येत नाही़ त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे़ हे नुकसान टाळण्यासाठी कला-क्रीडा शिक्षकांना आंदोलनाचे अस्त्र उगारावे लागेल़ मुख्याध्यापकांच्या भूमिकेचा साºया कला-क्रीडा शिक्षकांना त्रास होतोय़ - शेरशहा डोंगरी, विभागीय उपाध्यक्ष, जिल्हा शैैक्षणिक कला शिक्षक संघ-----------------------मुख्याध्यापक संघ दरवर्षी शैैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच नियोजन तयार करून देत असते़ स्थानिक पातळीवर काही शाळांनी अर्थात जवळपास ४० टक्के शाळा सुधारित वेळापत्रक राबविताहेत़ मोठ्या शाळांच्या बाबतीत थोडी अडचण आहे़ दोन महिने राहिलेत, सुधारणा होईलच़- तानाजी माने, अध्यक्ष, मुख्याध्यापक संघ
सोलापूर जिल्ह्याील शाळांची चालढकल, दोन महिन्यांनंतरही तासिका पूर्ववतची अंमलबजावणी होईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 2:08 PM
महाराष्ट्र शिक्षण विभागाने कला व क्रीडा शिक्षकांच्या तासिका कमी केल्या होत्या़ संबंधित शिक्षक संघटनांचे आंदोलन आणि पाठपुराव्यानंतर त्यांच्या तासिका पूर्ववत करण्याचा निर्णय जाहीर केला़ मात्र या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात शाळांनी चालढकल सुरू केली आहे़
ठळक मुद्दे- कला-क्रीडाबाबत शिक्षणमंत्र्यांच्या निर्णयाला केराची टोपली- मुख्याध्यापकांच्या भूमिकेचा साºया कला-क्रीडा शिक्षकांना त्रास - शाळांनी सुधारित वेळापत्रकाची अंमलबजावणी करायला काहीच हरकत नाही़