सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्ज वाटपाचा धडाका लावला असून, सोमवारपर्यंत २१ हजार ७९५ शेतकºयांना १६० कोटी ९७ लाख ७१ हजार रुपये खरीप हंगामासाठी वाटप केले आहे. मागील वर्षापेक्षा यावर्षी ५१ कोटी ९३ लाख ९२ हजार रुपये अधिक कर्ज वाटप केले आहे.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शेतकºयांना कर्ज मिळत नाही, अशी ओरड करुन जिल्ह्यातील शेतकरी थकले होते. बँकेचे प्रशासन व पदाधिकारी पैसे नसल्याचे कारण सांगत होते. एकीकडे थकबाकी वसुली होत नव्हती व दुसरीकडे नव्याने कर्जही मिळत नव्हते. पर्यायाने शेतकरी जिल्हा बँकेऐवजी अन्य बँकांकडून आपली आर्थिक गरज भागवत आहे. ३० मे रोजी प्रशासक म्हणून जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी पदभार घेतल्यानंतर शेतकºयांना कर्ज वाटप करण्यावर भर दिला जात आहे. ९ जुलैपर्यंत जिल्हाभरात १६० कोटी ९७ लाख ७१ हजार रुपये पीक कर्ज २१ हजार ७९५ शेतकºयांना वाटप केले आहे. मेअखेरला अवघे ४८ कोटी ७२ लाख ६० हजार रुपये कर्ज वाटप झाले होते.
मागील सव्वा महिन्यात कर्ज वाटपाची आकडेवारी १६१ कोटींवर गेली आहे. मागील वर्षापेक्षा यावर्षी ५१ कोटी ९४ लाख रुपये अधिक कर्ज वाटप केले आहे. शेतकºयांची संख्याही वाढली असून, मेअखेरला ४ हजार ९२९ शेतकºयांना कर्ज वाटले होते. ते सोमवार, दिनांक ९ जुलैपर्यंत २१ हजार ७९५ इतके झाले आहे. महिनाभरात १६ हजार ८६६ शेतकºयांना बँक कर्ज वाटू शकली.
कर्जमाफीतील शेतकºयांना हवंय कर्ज
- - प्रशासकाच्या सव्वा महिन्याच्या कालावधीत झाले १६ हजार ८६६ शेतकºयांना ११२ कोटी २५ लाख ११ हजार रुपये पीक कर्ज वाटप़
- - खरीप हंगामासाठी जिल्हा बँकेला २८४ कोटी ७९ लाख रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असून, आतापर्यंत १६० कोटी ९८ लाख रुपये म्हणजे ५६.५२ टक्के कर्ज वाटप केले आहे.
- - संपूर्ण कर्जमाफी झालेल्यांपैकी ४ हजार १०० शेतकºयांनी ४५ कोटी ४० लाख, एकरकमी परतफेड योजनेतील ५ हजार १३० शेतकºयांनी ५२ कोटी ३३ लाख, प्रोत्साहनचा फायदा मिळालेल्यांपैकी ३० हजार शेतकºयांनी २८५ कोटी असे एकूण ३९ हजार २३० शेतकºयांनी ३८२ कोटी ७२ लाख ६० हजार रुपयांची नव्याने कर्ज मागणी केली आहे.
कर्जमाफीतील शेतकºयांशिवाय..- एकरकमी परतफेड केलेल्यांपैकी ३ हजार ५८ शेतकºयांना २७ कोटी ७४ लाख, प्रोत्साहनचा लाभ घेतलेल्यांपैकी १५ हजार ५२१ शेतकºयांना १०४ कोटी ५० लाख ८७ हजार रुपये असे कर्जमाफीतील १८ हजार ५७९ शेतकºयांना १३२ कोटी २४ लाख ९१ हजार रुपये पीक कर्ज वाटप केले आहे. याशिवाय ३२१६ शेतकºयांना २८ कोटी ७२ लाख ८० हजार रुपये खरीप हंगामासाठी कर्ज दिले आहे. एकूणच जिल्ह्याची वसुली म्हणावी तितकी नाही. सांगोला तालुक्याची वसुली ८० टक्के असली तरी अन्य तालुके मागेच आहेत. वसुलीशिवाय कर्ज वाटप अशक्य आहे. यासाठीच बैठकांतून सूचना दिल्या जात आहेत.-अविनाश देशमुखप्रशासक, जिल्हा बँक