सोलापूर: दुष्काळी परिस्थिती, कर्जमाफीची होणारी मागणी, नियमित कर्ज भरणाºयांना वाºयावर सोडून कर्ज थकविणाºयांसाठी कर्जमाफी देण्याचे शासनाचे धोरण, शिवाय कर्ज भरण्याची मानसिकता कमी झाल्याने सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची मागील वर्षी १ हजार ३४ कोटी ४३ लाखांवर गेलेली थकबाकी यावर्षी काहीअंशी वाढण्याची शक्यता आहे. पाच वर्षांत थकबाकीदार शेतकºयांची संख्या वाढत-वाढत ९४ हजार ३९ इतकी झाली आहे.
सोलापूर जिल्हा बँकेचे दोन लाख कर्जदार शेतकरी सभासद आहेत. यापैकी अनेक शेतकरी दरवर्षी कर्ज घेतात व भरतातही; मात्र काही शेतकरी घेतलेले कर्ज न भरता कर्जमाफीची वाट बघतात. २००७-०८ मध्ये झालेल्या कर्जमाफीत थकबाकीदारांचे मोठ्या प्रमाणावर कर्ज माफ झाले; मात्र नियमित कर्ज भरणाºयांच्या हाती काहीच पडले नव्हते. त्याचा परिणाम थकबाकी वाढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून येते.
२००७-८ च्या कर्जमाफीनंतर चार वर्षे कर्ज वसुलीचे प्रमाण चांगले होते; मात्र त्यानंतर थकबाकीचे प्रमाण वाढत गेले आहे. कर्ज वाटपाची रक्कम, शेतकरी संख्या जशी वाढली आहे तशीच थकबाकीची रक्कमही दरवर्षी वाढत असल्याने बँक अडचणीत आली आहे. ज्यावर्षी दुष्काळी स्थिती निर्माण झाली त्यावेळी वसुलीवर काहीअंशी परिणाम होतो; मात्र पुढच्या वर्षी हीच परिस्थिती राहत नाही, असा आजवरचा अनुभव आहे; मात्र मागील तीन-चार वर्षांत वसुलीची टक्केवारी घसरत असल्याचे बँकेचे सरव्यवस्थापक किसन मोटे यांनी सांगितले.
कारखानदारांच्या थकबाकीचेही कारण...- सोलापूर जिल्ह्यातील नेतेमंडळींच्या साखर कारखान्यासाठी घेतलेले कर्ज मागील चार-पाच वर्षांत थकल्याचा परिणामही शेतकºयांच्या कर्ज वसुलीवर झाल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. शेतकºयांकडे अधिकारी वसुलीसाठी गेल्यावर पुढाºयांच्या कारखान्याची पहिली वसुली करा मग आमच्याकडे या, असे शेतकरी अधिकाºयांना बोलतात, त्यामुळे अधिकाºयांची मानसिकता शेतकºयांकडे वसुलीसाठी जाण्याची राहिली नाही, असे सांगण्यात आले.