आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २३ : जिल्हा बँकेला नव्याने १९ हजार ७१४ शेतकºयांची ग्रीन यादी आली असून, सोबत दोन टप्प्यात ४६ कोटी १७ लाख २१ हजार ७०९ रुपयेही आले आहेत. जिल्हा बँकेला आतापर्यंत ३२१ कोटी ८३ लाख २६ हजार २०४ रुपये कर्जमाफीसाठी मिळाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेसाठीच्या आॅनलाईन अर्ज केलेल्या उर्वरित खातेदारांची पात्र व अपात्र यादी करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ‘यलो’ यादीतील पात्र २३३४ शेतकºयांची यादी यापूर्वीच शासनाकडे गेली असून ‘मिसमॅच’मधील ३३ हजार २२६ पात्र शेतकºयांचीही यादी शासनाला पाठविण्यात आली आहे. या यादीची शासन स्तरावर तपासणी करून पैसे देण्यात येत आहेत. शासनाकडून आलेल्या व बँकेकडून तपासणी करून शासनाकडे पुन्हा गेलेल्या यादीमधील १९ हजार ७१४ शेतकºयांची नव्याने यादी जिल्हा बँकेकडे आली आहे. ही यादी बँक तपासणी करणार आहे. बँकेला आतापर्यंत शेतकºयांच्या सहा याद्या आल्या असून यापैकी ५४ हजार ६६३ शेतकºयांच्या खात्यावर २७५ कोटी ७३ लाख ५४ हजार ८५५ रुपये इतकी रक्कम जमा करण्यात आली आहे. यापूर्वी आलेल्या पाचव्या यादीतील दोन हजार ५२७ पात्र शेतकºयांच्या खात्यावर १४ कोटी ५२ लाख ५३ हजार ४५० रुपये जमा करण्याचे काम सध्या सुरू आहे. नव्याने बुधवारी आलेले ३१ कोटी ६४ लाख ६८ हजार २५९ रुपये शासन सूचनेनुसार जमा करण्यात येतील, असे सांगण्यात आले. ------------------------८८ हजार शेतकरी पात्र - जिल्हा बँकेला आतापर्यंत वेगवेगळ्या याद्या आल्या आहेत. यामध्ये ‘ग्रीन’ याद्या चार वेळा तर ‘यलो’ व मिसमॅच याद्या प्रत्येकी एक वेळा आली आहे. या याद्यांची तपासणी करून एक लाख १८ हजार ५६१ खातेदारांची ग्रीन यादी बँकेला आली होती. यापैकी ८७ हजार ७८० खातेदारांची यादी अचूक आहे. बँकेच्या एक लाख ६८ हजार ५६५ शेतकरी खातेदारांनी कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज भरले होते. -जिल्ह्यातील दीड लाखापर्यंतच्या थकबाकीदार ३९ हजार २३५ शेतकºयांच्या खात्यावर २४७ कोटी २६ लाख ३४ हजार ५०२ रुपये जमा झाले असून, नियमित कर्ज भरणाºया १५ हजार ४२८ शेतकºयांच्या खात्यावर २८ कोटी २९ लाख १४ हजार १४२ रुपये जमा झाले आहेत. दीड लाखावरील थकबाकीदार पात्र शेतकºयांची संख्या १६ हजार २२० इतकी असून, यापैकी ९०० शेतकºयांनी दीड लाखावरील रक्कम भरणा केली असल्याने त्यांच्या खात्यावर दीड लाखाप्रमाणे रक्कम जमा करण्यासाठी चार कोटींचा निधी आला आहे. ---------------------शासनाने उर्वरित खातेदारांची यादी व पैसे लवकर द्यावेत. दीड लाखावरील खातेदारांंनी रक्कम भरल्यानंतर किमान आठ दिवसात त्यांच्या खात्यावर दीड लाखाची रक्कम जमा करण्यासाठी आमच्या बँकेला आगाऊ रक्कम द्यावी. आमच्याकडे आलेल्या पात्र खातेदारांच्या खात्यावर तात्काळ रक्कम जमा करीत आहोत.- राजन पाटील, अध्यक्ष, जिल्हा बँक
शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला मिळाले ३२१ कोटी, ‘यलो’ यादीतील पात्र २३३४ शेतकºयांची यादी यापूर्वीच शासनाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 2:52 PM
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेसाठीच्या आॅनलाईन अर्ज केलेल्या उर्वरित खातेदारांची पात्र व अपात्र यादी करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
ठळक मुद्दे पाचव्या यादीतील दोन हजार ५२७ पात्र शेतकºयांच्या खात्यावर १४ कोटी ५२ लाख ५३ हजार ४५० रुपये जमा करण्याचे काम सध्या सुरू बँकेला आतापर्यंत शेतकºयांच्या सहा याद्या आल्या असून यापैकी ५४ हजार ६६३ शेतकºयांच्या खात्यावर २७५ कोटी ७३ लाख ५४ हजार ८५५ रुपये इतकी रक्कम जमा करण्यात आली‘मिसमॅच’मधील ३३ हजार २२६ पात्र शेतकºयांचीही यादी शासनाला पाठविण्यात आली