आप्पासाहेब पाटील सोलापूर दि ११ : थकीत वीज बिलांचा भरणा न करणाºया सोलापूर जिल्ह्यातील ३ हजार ३५५ हजारांहून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे़ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी महावितरणची पथके तैनात करण्यात आली असून, सुट्टीच्या दिवशीही ही मोहीम सुरूच ठेवण्यात येणार आहे़ यासाठी शाखानिहाय ३ अशी ३७० पथके तैनात करण्यात आल्याची माहिती अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी दिली़ वीज बिलांच्या थकबाकीचे प्रमाण वाढल्यास महावितरणला आर्थिक प्रश्नांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरमहा वीज बिलांसह वीजग्राहकांकडे असलेल्या थकबाकीची वसुली करण्यासाठी महावितरणने मंगळवारपासून धडक मोहीम राबविण्या स सुरुवात केली आहे. त्यानुसार सोलापूर मंडलातील पंढरपूर, अकलूज, बार्शी, सोलापूर ग्रामीण व सोलापूर शहरातील थकीत वीज बिलांच्या वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम तीव्र झाली आहे. यात वारंवार आवाहन करूनही थकीत वीज बिल न भरणाºया ३ हजार ५५५ पेक्षा जास्त थकबाकीदारांचा वीजपुरवठा गेल्या ३ दिवसांत खंडित करण्यात आला आहे. या ग्राहकांकडे १ कोटी ९ लाख २५ हजार रुपये थकीत आहेत.जिल्ह्यात सध्यस्थितीत २ लाख ९३ हजार घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांकडे ४० कोटी ८२ लाख रुपयांची थकबाकी आहे. ती वसूल करण्यासाठी येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत विशेष वीजतोड मोहीम राबविण्यात येणार आहे. वीजग्राहकांकडे किती रक्कम थकीत आहे हे न पाहता वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. यात थेट अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, लेखाधिकारी तसेच हजारो कर्मचारी सहभागी झाले आहेत. मोहिमेसाठी वरिष्ठ कार्यालयातील अभियंते, अधिकारी यांचेही विशेष पथक तयार केले आहे.वीजपुरवठा खंडित करण्याची थकबाकीदारांनी कटू कारवाई व संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी थकीत देयकांचा त्वरित भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. थकबाकीदारांविरोधात सुरु असलेली धडक मोहीम यापुढेही सुरु राहणार आहे. वीज बिलांबाबत ग्राहकांच्या तक्रारी असल्यास त्याचे त्वरित निराकरण करण्यात येणार आहे. थकीत वीज बिल भरण्यासाठी स्थानिक वीज बिल भरणा केंद्रांसह व घरबसल्या आॅनलाईन पेमेंटसाठी महावितरणची वेबसाईट तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपचा पर्याय उपलब्ध आहे.---------------------------वीज बिल भरणा केंद्रे सुटीच्या दिवशीही सुरूथकबाकी व चालू वीज बिलांचा ग्राहकांना भरणा करता यावा म्हणून महावितरणची सर्व अधिकृत वीज बिल भरणा केंद्रे दि.११ व १२ नोव्हेंबर रोजी सुटीच्या दिवशी सुरू राहणार आहेत. थकीत देयकांचा भरणा करणे सोयीचे व्हावे, यासाठी शनिवारी (दि.११) व रविवारी (दि. १२) सार्वजनिक सुटी असली तरी जिल्ह्यातील महावितरणची सर्व अधिकृत वीज बिल भरणा केंद्रे कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत़----------------विभागनिहाय अशी झाली वीजतोड मोहीम़़़अकलूज ३५३ ८ लाख ४६ हजारबार्शी ४६१ १८ लाख ८० हजारपंढरपूर ९५७ २७ लाख ३० हजारसोलापूर ग्रामीण ७२२ ३१ लाख ५६ हजारसोलापूर शहर १०६२ २३ लाख १३ हजारएकूण ३५५५ १ कोटी ९ लाख २५ हजाऱ-------------------थकबाकीचा आलेख दिवसेंदिवस वाढतच होता़ त्यामुळे महावितरणला नाइजास्तव वीजतोड मोहीम सुरू करावी लागली़ वीजग्राहकांनी वेळेवर वीज बिल भरून महावितरण प्रशासनास सहकार्य करावे, अन्यथा वीजतोड मोहिमेस सामोरे जावे लागेल़-ज्ञानदेव पडळकर,अधीक्षक अभियंता, सोलापूर मंडल़
सोलापूर जिल्ह्यातील ३५५५ वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित, महावितरणची वसुली मोहीम तीव्र : ३७० पथके तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 10:52 AM
थकीत वीज बिलांचा भरणा न करणाºया सोलापूर जिल्ह्यातील ३ हजार ३५५ हजारांहून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे़ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी महावितरणची पथके तैनात करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे२ लाख ९३ हजार घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांकडे ४० कोटी ८२ लाख रुपयांची थकबाकीवीजग्राहकांकडे किती रक्कम थकीत आहे हे न पाहता वीजपुरवठा खंडित करण्यात येणारवरिष्ठ कार्यालयातील अभियंते, अधिकारी यांचेही विशेष पथक तयारवीज बिल भरणा केंद्रे सुटीच्या दिवशीही सुरूवीज बिल भरणा केंद्रे कार्यालयीन वेळेत सुरू राहणार