सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाºयांना हेल्मेट सक्ती करावी़ जे अधिकारी, कर्मचारी वाहन चालविताना हेल्मेट घालणार नाहीत अशांवर कारवाई करा, तत्पूर्वी त्यांचे प्रबोधन, पत्रव्यवहार करून हेल्मेटबाबतीत जनजागृती, प्रचार, प्रसार करण्यावर भर द्यावा, अशा सूचना जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष खा़ विजयसिंह मोहिते-पाटील यांनी दिल्या.
शासकीय विश्रामगृहात जिल्हा रस्ता सुरक्षा सप्ताहाची बैठक खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते़ या बैठकीस आ़ गणपतराव देशमुख, जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले, जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे सचिव तथा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे, जि़प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ राजेंद्र भारूड, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, राष्ट्रीय महामार्गाचे उपविभागीय अभियंता ए. एल. भोसले, अधीक्षक अभियंता संतोष शेलार, सहा़ पोलीस आयुक्त वैशाली शिंदे आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
या बैठकीत रस्ते अपघाताचे प्रमाण कमी होण्यासाठी वाहतुकीच्या नियमांची प्रभावी जनजागृती करावी. अपघात होऊ नये म्हणून अपघाताच्या ठिकाणी अंशकालीन व दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात, जिल्ह्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग आणि जिल्हा मार्गावरील ब्लॅक स्पॉट ठिकाणी अपघात होऊ नये म्हणून आवश्यक उपाययोजना कराव्यात. रस्त्याच्या कडेची काटेरी झुडपे तत्काळ काढावीत, वळणाच्या ठिकाणी साईन बोर्ड लावावेत. ब्लॅक स्पॉट ठिकाणी समिती सदस्य व तज्ज्ञामार्फत पाहणी करावी, मोहोळ-पंढरपूर रस्त्यावरील पेनूर येथे वळणाच्या ठिकाणी गतिरोधक लावण्यासंदर्भात कार्यवाही व्हावी, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या़याचवेळी आ़ गणपतराव देशमुख यांनी सांगोला तालुक्यातील रस्त्यांबाबत प्रश्न मांडला़ त्यावर त्वरित कारवाई करण्याच्या सूचना खा़ मोहिते-पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाºयांना दिले़ वाहन चालवताना मोबाईलवरून बोलणे, मद्यपान करून गाडी चालवणे, सीटबेल्टचा वापर न करणे, उलट्या दिशेने वाहन चालवणाºयांवर कडक कारवाई करावी.
साखर कारखाना सुरू होत असून, ऊस वाहतूक करणाºया वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यासाठी आणि क्षमतेपेक्षा जादा मालाची वाहतूक करू नये, यासंदर्भात साखर कारखान्यांना सूचना द्याव्यात, असेही बैठकीत सांगण्यात आले.
६७०० दुचाकीस्वारांचे लायसन्स होणार रद्ददुचाकी चालविताना मोबाईलवर बोलणाºया ६७०० दुचाकीस्वारांचे लायसन्स (परवाना) ९० दिवसांसाठी रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे़ शहर पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेकडून त्यासंबंधीची कागदपत्रे व अहवाल आल्यास लवकरच कारवाई करण्यात येईल, असेही उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने सांगितले़ जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आल्याचेही सांगण्यात आले़
शहर व जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाºयांना हेल्मेट सक्ती करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली़ त्यानुसार उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून आता प्रत्येक शासकीय कार्यालयांना हेल्मेट सक्तीबाबत पत्रव्यवहार करून प्रबोधन करणार आहोत़ त्यानंतरही उपाययोजना झाल्या नाहीत तर कारवाई करणार आहोत़ सर्वांनी हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करण्यास सहकार्य करावे़- संजय डोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर