गोपालकृष्ण मांडवकर सोलापूर : यंदा पावसाने मारलेली दडी शेतकºयांची चिंता वाढविणारी आहे. यंदाच्या पावसाने गतवर्षीची सरासरी ओलांडणे तर सोडाच निम्माही पाऊस झाला नाही. यामुळे शेतशिवार तहानलेला असून, पीक परिस्थितीही धोक्यात आली आहे.
१३ आॅगस्टपर्यंतची परिस्थिती विचारात घेता सोलापूर जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी १८० मिलिमीटर आहे. गतवर्षी १३ आॅगस्ट २०१७ पर्यंत २४६.८२ मिलिमीटर पाऊस पडला होता. यंदा या तारखेपर्यंत फक्त ११०.६७ मिलिमीटर पाऊ स पडला आहे. ही टक्केवारी ४४.७६ आहे.
सोलापूर जिल्ह्यात सिंचन मोठ्या प्रमाणावर होते. उसाचे क्षेत्र मोठे आहे. असे असतानाही पावसाची टक्केवारी अद्यापही निम्म्याच्या खालीच आहे. यामुळे शेतकºयांची आणि प्रशासनाचीही चिंता यंदा वाढलेली दिसत आहे. आतापर्यंत बार्शीमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद आहे तर करमाळा तालुक्यात सर्वात कमी पाऊस पडला आहे. बार्शीमध्ये ७३ मिमी तर करमाळा फक्त ३३.८३ मिमी पावसाची नोंद १३ आॅगस्टपर्यंत झाली आहे. दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, माढा, मंगळवेढा या तालुक्यांमध्येही पावसाची स्थिती यंदा फारशी समाधानकारक नाही. तर बार्शीसह करमाळा, पंढरपूर आणि माळशिरस या तालुक्यात बºयापैकी पाऊस पडला आहे.
डाळिंबाचे निम्म्यावर क्षेत्र तेल्याने बाधितजिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला आणि माळशिरस या तीन तालुक्यात मोठ्या प्रमाणावर डाळिंबाची लागवड झाली आहे. मात्र या तिन्ही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. पंढरपूर तालुक्यात १० हजार १८५.५० हेक्टर क्षेत्रात डाळिंबाची लागवड आहे. त्यापैकी ६ हजार ९२२ हेक्टर क्षेत्र तेल्याने बाधित असल्याचा अहवाल आहे. सांगोला तालुक्यात १४ हजार ७८१ हेक्टर क्षेत्रावर डाळिंब असले तरी निम्मे म्हणजे ७ हजार ९४५.५० हेक्टर क्षेत्र तेल्या रोगाने ग्रासले आहे. माळशिरस तालुक्यात ६ हजार ७६० हेक्टरवरील डाळिंबापैकी ३ हजार ३६८ हेक्टर क्षेत्रावरील डाळिंबाचे पीक तेल्याच्या प्रभावाखाली आले आहे. हमखास नगदी उत्पन्नाचे हे पीक यंदा चांगले असले तरी तेल्या रोगामुळे शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
पेरणी क्षेत्र वाढले तरीही दुष्काळाचा धोकाजिल्ह्याचे सरासरी पेरणी क्षेत्र ८९ हजार हेक्टर आहे. मात्र यंदा मोठ्या प्रमाणावर पेरणी झाली. अडीच पटीने क्षेत्र वाढले असून, १ लाख ९५ हजार ८२२ हेक्टरवर पेरणी झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे. पेरणी क्षेत्राची ही टक्केवारी २४८ असल्याची विक्रमी नोंद यंदा प्रथमच कृषी विभागाने घेतली आहे. यात जूनमध्ये पेरणी झालेल्या मूग, उडीद, तसेच तूर, सोयाबिन, सूर्यफूल, भुईमूग या पिकांचा समावेश मोठ्या प्रमाणावर आहे. पेरणीचे क्षेत्र वाढूनही पाऊस पुरेसा नाही. त्यामुळे दुष्काळाचा धोका वाढला आहे. वेळेवर पाऊस न झाल्याने पिके वाया जाण्याची भीती आतापासूनच शेतकºयांमध्ये व्यक्त होत आहे.
मूग, सोयाबीन, उडीदला माव्याने ग्रासलेमूग, उडीद आणि सोयाबीन या पिकांना सध्या मावा रोगाने ग्रासले आहे. या पिकांची पेरणी जून महिन्यात झाली होती. ही पिके सध्या फुलोºयावर असली तरी माव्याच्या प्रादुर्भावामुळे पिके धोक्यात आहेत. तूर, सोयाबिन, सूर्यफूल आणि भुईमूग ही पिके वाढीच्या मार्गावर असल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे.