शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

सोलापूर जिल्ह्यात वाळूअभावी ‘विकास वेडा’ होण्याची चिन्हे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 12:31 PM

शासकीय कंत्राटदार झाले हतबल,  पुढील दोन वर्षांत हवी ६ लाख ब्रास वाळू

ठळक मुद्देमार्चअखेर आला तरी जिल्ह्यात वाळूचे लिलाव झालेले नाहीत२०१९ पर्यंत होणाºया विकासकामांसाठी ६ लाख ब्रास इतकी वाळू लागेलशासन स्तरावर  वाळू उपशाचे धोरणच निश्चित होत नाही

राकेश कदमसोलापूर : जिल्ह्यात २०१९ पर्यंत होणाºया विकासकामांसाठी ६ लाख ब्रास इतकी वाळू लागेल, अशी मागणी राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम, एनटीपीसी, लघु पाटबंधारे, महापालिका, रेल्वे आणि जिल्हा परिषद आदी शासकीय यंत्रणांनी जिल्हा गौण खनिज कार्यालयाकडे नोंदवली आहे. शासन स्तरावर  वाळू उपशाचे धोरणच निश्चित होत नाही. दुसरीकडे शासकीय ‘वसूलदारांमुळे’ वाळूचे दर   गगनाला भिडत आहेत. यामुळे जिल्ह्यातही ‘विकास वेडा झालाय’ म्हणण्याची चिन्हे दिसू लागली  आहेत. 

मार्चअखेर आला तरी जिल्ह्यात वाळूचे लिलाव झालेले नाहीत. खासगी बांधकामांबरोबरच शासकीय यंत्रणांवरही याचा परिणाम झाला आहे. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून लवकरच सोलापूर-कोल्हापूर चौपदरीकरणासह पालखी मार्गांच्या चौपदरीकरणाची कामे सुरू होणार आहेत. हे रस्ते काँक्रीटचे असतील. 

जूनपर्यंत ही कामे सुरु होतील. वेळेवर वाळू न मिळाल्यास मुदतीत कामे होणार नाहीत. सार्वजनिक बांधकाम, रेल्वेची कामेही रखडली आहेत. पाटबंधारे विभागाच्या कामात क्रॅश सँडचा वापर होत आहे. या कामांच्या दर्जाबद्दलही शंका उपस्थित होत आहे. 

४१ वाळू गटांचा जिल्हास्तरावर होणार निर्णय- जिल्हा प्रशासनाने राज्य पर्यावरण विभागाकडे पूर्वी ५ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रातील २३ वाळू गटांचे प्रस्ताव पाठविले होते. खाणकाम आराखड्याअभावी राज्यस्तरावर निर्णय लटकला आहे. वाळूची वाढती मागणी लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने भीमा आणि माण नदीपात्रातील ५ हेक्टरच्या आतील ४१ वाळू गटांचे प्रस्ताव तयार केले आहेत. ५ हेक्टरच्या आतील वाळू गटांच्या लिलावाचा निर्णय जिल्हास्तरीय पर्यावरण समिती घेऊ शकते.

शासन निर्णयानुसार यातील अजनसोंड-मुंढेवाडी आणि देगाव-मुंढेवाडी (ता. पंढरपूर) येथील दोन वाळू गटांचा खाणकाम आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयाच्या उपसंचालकांकडे (कोल्हापूर) पाठविण्यात आला आहे. उपसंचालकांनी हा आराखडा मंजूर केल्यास उर्वरित ३९ ठिकाणांचा आराखडा तयार केला जाईल. हा आराखडा पुन्हा जिल्हास्तरीय समितीपुढे ठेवून वाळू लिलाव एप्रिलच्या मध्यावधीत घेण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन करीत आहे. 

महापालिकेची झाली अडचण- वाळूचे लिलाव नसल्यामुळे व प्रशासनाने चोरट्या वाहतुकीवर प्रभावी कारवाई केल्याने शहरात वाळूची आवक थांबली आहे. त्यामुळे शहरातील बांधकामे तर थांबलीच आहेत. याशिवाय महापालिकेच्या विकासकामावर परिणाम झाला आहे. अमृत योजनेतून सोरेगाव, जुळे सोलापूर, भवानी पाणीगिरणी, पाकणी जलशुद्धीकरण केंद्र येथे फिल्टर बेड व इतर बांधकामाची कामे सुरु आहेत. याशिवाय शहरात पाण्याच्या टाक्या उभारण्यात येत आहेत.

पाणीपुरवठा वितरण सुधारण्याच्या दृष्टीने ही कामे वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. पण वाळूअभावी ही कामे रखडली आहेत. या कामांना वाळू उपलब्ध करण्याबाबत आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी महसूल प्रशासनाकडे मागणी केली आहे. याशिवाय विजापूर रोड, जुळे सोलापुरातील ड्रेनेज योजना पूर्ण झाली असून, ड्रेनेजजोड देण्याचे काम सुरु आहे. ही कामे वाळूअभावी ठप्प झाल्याने नागरिकही संतप्त झाले आहेत. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयPoliceपोलिस