शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

सोलापूर जिल्हा ; शेतकºयांच्या नावाखाली विमा कंपनीचंच होतंय भलं !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 11:50 AM

जमा झाले ८२ कोटी :  ६३ हजार शेतकºयांना मिळाले ३१.२२ कोटी

ठळक मुद्देविमा कंपनीकडे आजही काही शेतकºयांची प्रकरणे पेंडिंगमागील तीन-चार वर्षांपासून पिकांचा विमा भरण्याकडे शेतकºयांचा कलजिल्ह्यातील दोन लाख २६ हजार ९७० शेतकºयांनी विम्याची रक्कम भरली

अरुण बारसकर  सोलापूर : संपूर्ण जिल्ह्यातून दोन लाख २६ हजार ९७० शेतकºयांनी खरीप पिकांसाठी विम्याची रक्कम भरली असली तरी अवघ्या ६३ हजार २०९ शेतकºयांना पैसे मिळाले आहेत. विमा कंपनीला मिळालेली रक्कम व कंपनीने शेतकºयांना दिलेली नुकसान भरपाईची रक्कम पाहता कंपनीचेच भले होत असल्याचे दिसत आहे.

अतिवृष्टी, कमी पाऊस, गारपीट व अन्य कारणांमुळे पिकांचे नुकसान होते. त्यावेळी पीक विम्याचा चांगलाच आधार शेतकºयांना होतो. काहीअंशी तरी नुकसान भरपाई विमा कंपनीकडून मिळते. सोलापूर जिल्हा हा रब्बी असला तरी खरीप व रब्बी या दोन्ही हंगामांसाठी पीक विम्याची रक्कम भरुन घेतली जाते. 

मागील तीन-चार वर्षांपासून पिकांचा विमा भरण्याकडे शेतकºयांचा कल आहे. विम्याची रक्कम भरणाºया शेतकºयांपैकी काही शेतकºयांना नुकसान भरपाईही मिळते. यामुळे विमा भरण्यासाठी शेतकºयांची संख्याही वाढत आहे. मागील वर्षी खरीप हंगामासाठी सोलापूर जिल्ह्यातील दोन लाख २६ हजार ९७० शेतकºयांनी विम्याची रक्कम भरली होती. यामध्ये कर्जदार ७ हजार ६५९ व बिगर कर्जदार दोन लाख १९ हजार ३११ शेतकºयांचा सहभाग होता. 

शेतकरी, केंद्र शासन व राज्य शासनाने एकूण ८१ कोटी ८४ लाख ८३ हजार रुपये इतकी रक्कम विमा कंपनीकडे जमा केली होती. यापैकी ६३ हजार २०९ शेतकºयांना ३१ कोटी २२ लाख ८ हजार रुपये इतकी रक्कम नुकसान भरपाईपोटी शेतकºयांना मिळाली आहे. 

आठ तालुक्यांना वगळले

  • - बार्शीच्या २६ हजार ९८९, अक्कलकोटच्या १७ हजार ११५ व दक्षिणच्या १९ हजार ७२ अशा एकूण ६३ हजार २०९ शेतकºयांना मिळाली नुकसान भरपाई, परंतु आठ तालुके वगळले.
  • - बार्शीच्या ८५ हजार ३१६, अक्कलकोटच्या २४ हजार ६४३, दक्षिणच्या २८ हजार ८६७, उत्तरच्या ४ हजार २४५, मोहोळच्या १ हजार ६८६, पंढरपूरच्या ७३, मंगळवेढ्याच्या ५३ हजार ७४६, सांगोल्याच्या १० हजार ९८३, माळशिरसच्या ५११, माढ्याच्या ११ हजार ७३० व करमाळ्याचे ५ हजार १७० अशा दोन लाख २६ हजार ९७० शेतकºयांनी विम्याची रक्कम भरली होती.
  • - कर्जदार ४ हजार ४०५ व बिगर कर्जदार एक लाख ५९ हजार  ३५६ अशा विमा भरणाºया एक लाख ६३ हजार ७६१ शेतकºयांना नुकसान भरपाई मिळाली नाही.
  • - शेतकºयांनी १० कोटी २० लाख व केंद्र तसेच राज्य शासनाने विमा कंपनीकडे ८१ कोटी ८४ लाख ८३ हजार रुपये विमा कंपनीकडे जमा केले होते. प्रत्यक्षात ३१ कोटी २२ लाख ८ हजार रुपये नुकसान भरपाईपोटी शेतकºयांना दिल्याने जमा झालेल्यापैकी ५० कोटी ६२ लाख ७५ हजार रुपये कंपनीकडे शिल्लक आहेत.

मागील तीन वर्षांच्या उत्पन्नाच्या आधारावर पिकांचे उंबरठा नुकसान ठरवले जाते. यामुळे सर्वच पिकांना नुकसान भरपाई मिळेल असे नाही. विमा कंपनीकडे आजही काही शेतकºयांची प्रकरणे पेंडिंग आहेत.- बसवराज बिराजदार,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

 एकाच तालुक्यातील एका मंडलातील शेतकºयांना नुकसान भरपाई मिळते, मात्र शेजारच्या मंडलातील शेतकरी पैसे भरुनही नुकसान भरपाईपासून वंचित ठेवला जातो. पीक कापणी प्रयोग कागदावरच असतात.- प्रभाकर देशमुख,अध्यक्ष, जनहित शेतकरी संघटना 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय