आप्पासाहेब पाटील : सोलापूर आॅनलाइन लोकमतसोलापूर दि १३ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी / मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा आॅनलाइन निकाल जाहीर झाला़ यात सोलापूर जिल्ह्याचा निकाल ९२.४७ टक्के एवढा लागला आहे़ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर निकालाच्या तारखांविषयीची खोटी माहिती फिरत होती, अखेर राज्य मंडळाकडून निकालाच्या तारखेची अधिकृत घोषणा करण्यात आल्याने या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. सोलापूर जिल्ह्यातून एकूण ६६ हजार १०७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते़ त्यापैकी ६१ हजार १२६ विद्यार्थी पास झाले आहेत़ तालुकानिहाय निकाल पुढीलप्रमाणे ---अक्कलकोट : ९०़९८ टक्केबार्शी : ९३़५७ टक्केकरमाळा : ८६़०६ टक्केमाढा : ८९़६२ टक्केमाळशिरस : ८८़४७ टक्केमंगळवेढा : ९१़६३ टक्केमोहोळ : ९४़१७ टक्केपंढरपूर : ८८़९८ टक्केउत्तर सोलापूर व शहर : ९१़०१ टक्केसांगोला : ९०़६१ टक्केदरवर्षी दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो, यंदा निकाल जाहीर होण्यास एक आठवडा विलंब झाला आहे. त्यामुळे आपल्याला किती टक्के गुण मिळाले याबाबतची विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता ताणली होती़ दहावीच्या परीक्षेसाठी राज्यातील 14 लाख विद्यार्थ्यांनी मंडळाकडे आवेदन पत्रे भरली होती.
सोलापूर जिल्ह्याचा ९२़.४७ टक्के निकाल, मुलींच टॉपर
By admin | Published: June 13, 2017 1:22 PM