अरुण बारसकरसोलापूर: पाणी पुरवठ्यासाठी गावागावात योजना राबवूनही यावर्षी ४७० हून अधिक म्हणजे अर्ध्या जिल्ह्याला टँकरने पाणी द्यावे लागणार असल्याचे संभाव्य टंचाई आराखड्यात म्हटले आहे. जिल्ह्यात लहान-मोठा १७-१८ लाख जनावरांसाठी नोव्हेंबरनंतर चाºयाची उपलब्धता करावी लागणार आहे. सरासरीच्या अवघा ४० टक्के पाऊस पडल्याचे हे परिणाम आॅगस्ट २०१९ पर्यंत दिसणार आहेत.
सोलापूर जिल्ह्यात यावर्षी परतीच्या पावसाने गुंगारा दिल्याने दुष्काळी स्थितीची तीव्रता वाढली आहे. सप्टेंबरनंतर दुष्काळाची जाणीव होवू लागल्याने प्रशासनही त्यादृष्टीने नियोजन करीत आहे. यावर्षी जिल्ह्यात एकूण ५ हजार ३७० मि.मी. इतका पाऊस अपेक्षीत असताना २१८९ मि.मी. इतकाच पाऊस पडला. सरासरी ४८८.८३ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षीत असताना अवघा १९९ मि.मी. म्हणजे ४०.७१ मि.मी. पाऊस पडला. यामुळेच दुष्काळाला सामोरे जाण्याची वेळ जिल्ह्यावर आली आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी १३७६ उपाययोजना कराव्या लागणार असून त्यासाठी ३० कोटी ८९ लाख रुपये खर्चाचा आराखडा केला आहे. यामध्ये ४७० गावासाठी टँकर गृहीत धरुन २० कोटीचा खर्च होणार आहे. विहीर खोल करणे, नळ योजना तात्पुरती दुरुस्ती व अन्य कामांसाठी ११ कोटी खर्च गृहीत धरला आहे.
जिल्ह्यात लहान-मोठी १७ ते १८ लाख जनावरे आहेत. या जनावरांसाठी कृषी खात्याने दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबरपर्यंत चारा उपलब्ध असून त्यानंतर चाºयाची उपलब्धता करावी लागणार आहे. राज्य शासनाच महत्वाकांशी अहित्यादेवी होळकर विहीर योजना व जनावरांच्या गोट्याच्या निर्मितीसाठी प्रशासनाने नियोजन करणे आवश्यक आहे.
विहिरींच्या खोदाईमुळे आगामी काळात पडणाºया पावसाचा अल्पभुधारक शेतकºयांना फायदा होईल व जनावरांसाठी गोठेही तयार होतील. गोधन जोसण्यासाठी चारा व पाण्याचा प्रश्न प्रशासनाच्या पटावर राहणारच आहे सोबत जवाहर विहिरी, गुरांचे गोटे यासारख्या योजनांकडेही लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
जलयुक्त शिवार योजनेमुळे स्थिती चांगली !- मागील वर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यात ४०७ मि.मी. म्हणजे ८३ टक्के पाऊस पडला होता. मागील दोन-तीन वर्षांत झालेल्या जलयुक्तच्या कामामुळे पडलेल्या पावसाचे पाणी साठले होते. या पाण्याचा उपयोग आतापर्यंत होत आहे. केवळ जलयुक्तच्या कामामुळे पडलेले पाणी जमिनित गेल्याने आज पाण्याची स्थिती चांगली आहे.
तलाव पडले कोरडे
- - जिल्ह्यातील उजनी धरण भरले असले तरी सात मध्यम प्रकल्पात अवघे २५.५६ द.ल.घ.मी. पाणीसाठा आहे. ५६ लघू प्रकल्पापैकी अवघ्या ६ तलावात २.६२ टक्के पाणी आहे. उर्वरित ५० तलाव कोरडे आहेत. तलाव कोरडे असल्यानेच पाण्याच्या टंचाईच्या झळा अधिक तीव्र होणार आहेत.
पाणीपातळी सव्वादोन मीटरवर खोल
- - जिल्ह्यातील जमिनीची पाणी पातळी आॅक्टोबर महिन्यात सव्वा दोन मिटरने खोलवर गेल्याने पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत.
- - जिल्ह्यात साखर कारखाने व उसाचे क्षेत्र अधिक असले तरी पाण्याअभावी तसेच हुमणीच्या प्रादुर्भावामुळे वजनात मोठी घट येण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
- - खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्याने हताश झालेल्या शेतकºयांना पावसाअभावी रब्बी हंगामावरही पाणी सोडावे लागणार आहे.