आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २१ : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व अन्य राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत सन २०१६-१७ मध्ये सोलापूर जिल्हा सर्व बाबींमध्ये २३ व्या क्रमांकावर असताना तीन महिन्यांत तो राज्यात तिसºया क्रमांकावर आला आहे. ही जिल्ह्याच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब म्हणावी लागेल. घरकुलांच्या बाबतीत ९९ टक्के काम प्रगतिपथावर असून, डिसेंबरअखेर १०० टक्के काम पूर्ण होईल, अशी ग्वाही जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिली.प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व इतर राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत सन २०१६-१७ मध्ये एकूण १३,०२९ घरकुलांना प्रशासकीय मान्यता पूर्ण केली आहे. आॅनलाईन आवास सॉफ्टवेअरमध्ये हे कामकाज १०० टक्के पूर्ण झाले आहे. १३,०२९ मंजूर घरकुलांपैकी आजअखेर १२,८८७ घरकूल लाभार्थ्यांना पहिल्या हफ्त्याचे वाटप करण्यात आले आहे. ९९ टक्के काम पूर्ण झाले असून, दुसरा ७३७७ रुपयांचा हप्ता लाभार्र्थींना वाटप करण्यात आला आहे. ५७ टक्के काम पूर्ण झाले असून, मे २०१७ पासून ते आजअखेर एकूण मंजूर घरकुलांपैकी १२७९ घरकुले बांधून पूर्ण केली आहेत. उर्वरित ११,७५० घरकुलांचे काम डिसेंबरअखेर १०० टक्के पूर्ण करण्याचे नियोजन आखल्याचे सीईओ डोंगरे यांनी सांगितले.इंदिरा आवास योजनेंतर्गत २००८-०९ ते २०१५-१६ अखेर एकूण ७५७९ अपूर्ण घरकुलांपैकी मे २०१७ ते आजअखेर १७७१ घरकुले पूर्ण केली आहेत. उर्वरित अपूर्ण घरकुले आॅक्टोबर २०१७ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. २०१७-१८ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत प्राप्त ५२७१ उद्दिष्टापैकी आजअखेर एकूण १४६४ घरकुलांना आॅनलाईन मान्यता देण्यात आली आहे. उर्वरित ३८०७ घरकुलांना आॅगस्ट २०१७ अखेर १०० टक्के प्रशासकीय मान्यता देऊन पहिला हप्ता १०० टक्के वाटप करण्यात येत आहे. अन्य राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत २०१६-१७ मध्ये सोलापूर जिल्हा राज्यात सर्व बाबींमध्ये २३ व्या क्रमांकावर होता, तो सीईओ डॉ. भारुड रुजू झाल्यानंतर तिसºया क्रमांकावर आल्याचे उपलब्ध माहितीनुसार समोर आले आहे.----------------------------सोलापूर जिल्ह्याच्या दृष्टीने अभिमानास्पद कामकाज करताना तालुक्यातील सर्व गटविकास अधिकारी, संबंधित अधिकारी, कर्मचाºयांचे योगदान मोलाचे आहे. जिल्हास्तरावरुन जिल्हा ग्रामीण यंत्रणामधील प्रकल्प संचालक, सहायक प्रकल्प संचालक, उपअभियंता, शाखा अभियंता यांचे परिश्रम मोलाचे आहे. - राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.सोलापूर
शासनाच्या योजना परिपूर्ण राबविण्यात सोलापूर जिल्हा राज्यात तिसरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 2:35 PM
सोलापूर दि २१ : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व अन्य राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत सन २०१६-१७ मध्ये सोलापूर जिल्हा सर्व बाबींमध्ये २३ व्या क्रमांकावर असताना तीन महिन्यांत तो राज्यात तिसºया क्रमांकावर आला आहे
ठळक मुद्दे१३,०२९ घरकुलांना प्रशासकीय मान्यता पूर्णडिसेंबरअखेर १०० टक्के पूर्ण करण्याचे नियोजन जिल्ह्याच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब