शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

चिंता कायम; सोलापूर जिल्ह्याचा मृत्यूदर घसरला; मात्र राज्यात आजही अव्वल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 10:55 AM

लॉकडाऊननंतरची स्थिती; मुंबई, पुणे, ठाणे शहरांच्या तुलनेत सोलापूर शहराचा मृत्यूदर तीन ते चार टक्क्यांनी जास्त

ठळक मुद्देमुंबई शहरातील कोरोनाचा मृत्यूदर ५.६१ टक्के, पुण्याचा मृत्यूदर अडीच टक्केठाणे शहराचा मृत्यूदर ३.३५ टक्के तर औरंगाबाद शहरातील मृत्यूदर ४.६३ टक्केसोलापूर शहरातील मृत्यूदर २२ जुलै रोजी ८.२१ टक्के, सोलापुरातील वाढता मृत्यूदर चिंतेचा विषय

राकेश कदम

सोलापूर : जूनअखेर दहा टक्क्यांवर गेलेला जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूदर आता सहा टक्क्यांवर आला आहे. मात्र हा मृत्यूदरही आजच्या घडीला राज्यात सर्वाधिक असल्याचे दिसते. चिंतेची बाब म्हणजे मुंबई, पुणे, ठाणे शहरांच्या तुलनेत सोलापूर शहराचा मृत्यूदर तीन ते चार टक्क्यांनी जास्त आहे. 

मुंबई, पुणे शहरात मार्च महिन्यात कोरोनाचे रुग्ण आढळले. सोलापूर शहरात १२ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. एप्रिल आणि मे महिन्यात फारशी रुग्णवाढ दिसत नव्हती. २२ मे रोजी जिल्ह्यात कोरोनाचे ४८८ रुग्ण होते तर ३४ जणांचा मृत्यू झाला. मृत्यूदर ६९८ टक्के होता. जून महिन्यात केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय घेतला. 

१५ दिवसांतच जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट झाली. ७ जून रोजी जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूदर ८.६७ टक्के होता. पुन्हा १५ दिवसांत रुग्णांची संख्या दुप्पट झाल्याची स्थिती होती. जिल्ह्याचा मृत्यूदर ८.५१ टक्क्यांवर होता. २७ जून रोजी जिल्ह्याचा मृत्यूदर दहा टक्क्यांवर होता. या दिवसांत मध्यप्रदेशातील झाशी पहिल्या क्रमांकावर तर पंचकुला दुसºया क्रमाकांवर होते. हा शहरांचा मृत्यूदर अनुक्रमे १०.७ टक्के आणि १०.४ टक्के तर सोलापूरचा मृत्यूदर १० टक्के असल्याचे वृत्त देशभरातील वेबसाईट्सवर प्रकाशित झाले होते. सात जुलै रोजी जिल्ह्याचा मृत्यूदर ८.९८ टक्के झाला. १५ दिवसांनंतर २२ जुलै रोजी मृत्यूदर ६.०२ टक्क्यांवर पोहोचल्याचे प्रशासनाच्या आकडेवारीतून स्पष्ट  होते. जळगाव जिल्हा दुसºया क्रमांकावर आहे. 

मुंबईपेक्षा सोलापूर शहराचा मृत्यूदर अधिकमुंबई शहरातील कोरोनाचा मृत्यूदर ५.६१ टक्के, पुण्याचा मृत्यूदर अडीच टक्के आहे. ठाणे शहराचा मृत्यूदर ३.३५ टक्के तर औरंगाबाद शहरातील मृत्यूदर ४.६३ टक्के आहे. एप्रिल आणि मे महिन्यात या शहरातील स्थिती चिंताजनक होती. परंतु, या शहरांमधील मृत्यूदर घटत असल्याचे दिसते. सोलापूर शहरातील मृत्यूदर २२ जुलै रोजी ८.२१ टक्के आहे. मुंबई हे दाट लोकवस्तीचे शहर मानले जाते. मुंबईपेक्षा सोलापुरातील वाढता मृत्यूदर चिंतेचा विषय आहे.

प्रशासन काय म्हणते महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी आरोग्य मंत्र्यांना दिलेल्या अहवालात काही कारणे नमूद केली आहेत. जिल्ह्यातील मृतांमध्ये ६० वर्षांवरील ६५ टक्के रुग्ण आहेत. हे रुग्ण अखेरच्या दिवसांत उपचारासाठी दाखल झाले. या रुग्णांना इतरही गंभीर आजार होते. दाट लोकवस्तीच्या भागातील नागरिकांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांचा लवकर मृत्यू होतोय. यासाठी पालिकेने ज्येष्ठ नागरिकांची अँटिजेन टेस्ट मोहीम हाती घेतली असून, ज्येष्ठ नागरिकांवर दर आठ दिवसाला लक्ष ठेवले जाणार आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल