शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

सोलापूर विभागाच्या एसटीचेही स्टेअरिंग आता महिलांच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 10:57 AM

दोघींची निवड  : प्रशिक्षण सुरू; आणखी पाच महिला चालक येणार

ठळक मुद्देसोलापूर विभागात पहिल्यांदाच चालक कम वाहक पदावर दोन महिलाप्रत्येक महिलेला पंधरा दिवस चालन आणि पंधरा दिवस वाहकाचे काममहिला चालकांना तीन टप्प्यात एसटी विभागाच्या वतीने प्रशिक्षण दिले

रूपेश हेळवेसोलापूर : या २१ व्या शतकात असे कोणतेही क्षेत्र राहिलेले नाही जिथे मुलींनी आपले अस्तित्व सिद्ध केले नाही. मग ते अंतराळात जायचं असो किंवा एसटी चालवायचे असो. प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे़ राज्य परिवहन महामंडळ सोलापूर विभागातही एसटी स्टेअरिंग महिलांच्या हाती असणार आहे. यासाठी दोन महिलांची निवड करण्यात आली आह़े  सोलापूर विभागाच्या इतिहासात पहिल्यांदाच एसटीची स्टेअरिंग आता महिला चालकांच्या हाती असणार आहे. दीक्षा भीमराव घुले आणि पूनम अशोक डांगे असे सोलापूर विभागात निवड झालेल्या महिला चालक कम वाहकांची नावे आहेत.

या दोघींनीही प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हे क्षेत्र निवडले आहे़ २०१९ मध्ये झालेल्या एसटी भरतीमध्ये दोन मुलींनी सोलापूर विभागातून वाहक कम चालक पदासाठी अर्ज केला होता़ या मुलींची निवड झाली असून, त्यांना सध्या सोलापूर विभागात प्रशिक्षण देण्यात येत आहे. या महिलांना वाहक कम चालकाचे प्रशिक्षण असणार असून, हे जवळपास तीन महिन्यांपर्यंत असणार आह़े याचबरोबर त्यांना एक वर्षाचे आॅनरोड चालनाचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे. 

सोलापूर विभागात जवळपास साडेचार हजार कर्मचारी आहेत. यातील महिलांची संख्या कमी प्रमाणात आहे़ यामध्ये आता भर पडेल़ सध्या दोन महिलांचे प्रशिक्षण सुरू असून, येत्या आठवड्यामध्ये आणखी पाच महिला सोलापूर विभागात दाखल होतील़ 

असे असणार प्रशिक्षण- या निवड झालेल्या महिला चालकांना तीन टप्प्यात एसटी विभागाच्या वतीने प्रशिक्षण दिले जाणार आहे़ पहिल्या टप्प्यात जवळपास तीन महिन्यांचा वर्ग प्रशिक्षण असणार आहे़ त्यानंतर प्रत्यक्ष मार्ग प्रशिक्षण असणार आहे़ यामध्ये जवळपास शहराबाहेर १५० किलोमीटर चालन, शहरात ९५ किलोमीटरपर्यंत चालन असे प्रशिक्षण असणार आहे आणि वाहकाचेही प्रशिक्षण देण्यात येणार आहे़ 

सोलापूर विभागात पहिल्यांदाच चालक कम वाहक पदावर दोन महिला आलेल्या आहेत़ त्यांना सध्या प्रशिक्षण देण्यात येत आहे़ प्रत्येक महिलेला पंधरा दिवस चालन आणि पंधरा दिवस वाहकाचे काम प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर दिले जाईल़ - रमाकांत गायकवाड, विभाग नियंत्रक, सोलापूर

मला वाहन चालवण्याची आवड असल्यामुळे मी वाहक कम चालक पदासाठी सोलापूर विभागात अर्ज केले आणि माझी निवड झाली़ हा माझ्यासाठी सुखद धक्का होता़ यामध्ये मला कुटुंबीयांचे खूप सहकार्य मिळाले़ सोलापूर विभागात आल्यानंतर विभाग नियंत्रकांनीही आम्हाला चांगले मार्गदर्शन केले.- पूनम डांगे, महिला चालक कम वाहक, सोलापूर 

माझ्या घरची परिस्थिती खूप हलाखीची आहे़ आई, वडील, भाऊ हे टेलरिंगचे काम करतात़ पण मला गाडी चालवण्याची आवड आहे़ यामुळे या पदासाठी अर्ज केला आणि माझी निवड झाली़ यामध्ये माझ्या सर्व कुटुंबीयांनीही मला प्रोत्साहन दिले़ आज त्यांच्यामुळेच मी या पदावर चांगले काम करण्याची माझी जिद्द पूर्ण करेऩ- दीक्षा घुले, महिला वाहक कम चालक

टॅग्स :SolapurसोलापूरjobनोकरीTravel Tipsट्रॅव्हल टिप्स