शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

Solapur: डॉक्टर तुम्ही सुद्धा... लाखाची लाच घेताना ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात

By विलास जळकोटकर | Updated: December 18, 2024 19:46 IST

Solapur News: लॅबच्या तक्रारीचा अहवाल सकारात्मक पाठण्यासाठी एक लाखाची लाच स्वीकारताना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. माधव विष्णूपंत जोशी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

- विलास जळकोटकर सोलापूर - लॅबच्या तक्रारीचा अहवाल सकारात्मक पाठण्यासाठी एक लाखाची लाच स्वीकारताना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. माधव विष्णूपंत जोशी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. बुधवारी झालेल्या या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. रात्री सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु होती.

यातील तक्रारदाराची लॅब आहे. त्यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात कार्यान्वित असलेल्या महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत दाखल होणाऱ्या रुग्णांचे रक्त व लघवीचे नमुने तपासून रिपोर्ट सादर करण्याचे काम निविदेद्वारे मिळालेले होते. तक्रारदाराच्या लॅबच्या विरोधात आलेला तक्रारी अर्ज पुढील चौकशीसाठी डॉ. माधव जोशी यांच्याकडे होता.

या तक्रारीच्या अनुषंगाने डॉ. जोशी यांनी तक्रारदारांना संपर्क साधून त्यांच्या लॅबच्या कामाबद्दल तक्रार प्राप्त झाल्याचे सांगून तुमच्या बाजूने अहवाल वरिष्ठाकडे पाठवतो असे सांगून तसेच लॅबविरोधात अहवाल पाठवल्यास महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत केलेल्या कामाचे उर्वरित बील निघणार नाही, अशी भीती दाखवून त्यासाठी २ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. याप्रकरणी पडताळणी होऊन बुधवारच्या कारवाई झाली. सदर बझार पोलीस ठाण्यात रात्री भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम ७ अन्वये गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु होते.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे-खराडे, उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार श्रीराम घुगे, राजू पवार, सचिन राठोड, शाम सुरवसे यांनी केली. आधी पडताळणी मग कारवाईत्यानंतर डॉ. जोशी यांनी तडजोडी अंती १ लाख रुपये लाचेची मागणी केल्याचे लाच लुचपतच्या पथकाने मंगळवारी केलेल्या पडताळणी कारवाईत निष्पन्न झाले. त्यानुसार बुधवारी सापळा लावण्यात आला. यात पहिला हप्ता म्हणून १ लाख रुपये लाच स्वीकारल्याचे लाचलुचपत पथकाने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. 

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणdocterडॉक्टरSolapurसोलापूर