शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
3
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
4
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
5
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
6
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
7
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
8
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
9
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
10
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
11
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
12
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
13
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
14
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
15
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल
16
आकाश कोसळले तरी चालेल, न्याय दिला गेलाच पाहिजे!
17
एकत्र लढतील, दिसतील; पण एकत्र राहतील?
18
निवडणुका अनेक, देश एक!
19
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
20
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय

Solapur: घरात छापा टाकून लाख रूपयाच्या देशी-विदेशी दारूचा साठा जप्त, एकास अटक

By संताजी शिंदे | Published: July 13, 2024 7:24 PM

Solapur News: बार्शी तालुक्यातील ढेंबरेवाडी व घोळवेवाडी या गावातील दोन घरांमध्ये छापा टाकून, एक लाख सहा हजार ५० रूपये किंमतीचा देशी-विदेशी दारू साठा जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली असून, एकाला अटक करण्यात आली आहे.

- संताजी शिंदे सोलापूर - बार्शी तालुक्यातील ढेंबरेवाडी व घोळवेवाडी या गावातील दोन घरांमध्ये छापा टाकून, एक लाख सहा हजार ५० रूपये किंमतीचा देशी-विदेशी दारू साठा जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली असून, एकाला अटक करण्यात आली आहे.

शुक्रवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने बार्शी तालुक्यातील ढेंबरेवाडी या गावातील प्रमोद महादेव घोळवे याच्या त्रिमूर्ती निवास या राहत्या घरात छापा टाकण्यात आला. छाप्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने देशी दारूच्या‌ १४६ बाटल्या, विदेशी दारूच्या विविध ब्रॅंडच्या २४८ बाटल्या, बियरच्या ५९ बाटल्या असा एकूण ६७ हजार ११० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या गुन्ह्यातील आरोपी प्रमोद घोळवे याचेविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.

अन्य एका कारवाईत पथकाने घोळवेवाडी (ता.बार्शी) येथील विवेक महादेव घोळवे याच्या दत्तकृपा या राहत्या घरात छापा टाकला. घरातून देशी दारूच्या १४४ बाटल्या व विदेशी दारूच्या ११० बाटल्या व ५५ बियरच्या बाटल्या असा ३८ हजार ९४० रुपये किमतीचा दारु साठा जप्त केला. आरोपी विवेक महादेव घोळवे याचेविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक, उपअधीक्षक संजय पाटील, निरीक्षक नंदकुमार जाधव, जगन्नाथ पाटील, दुय्यम निरीक्षक सुखदेव सिद, अंजली सरवदे, संगीता जाधव, सहायक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, गजानन होळकर, जवान अनिल पांढरे, योगीराज तोग्गी, इस्माईल गोडीकट, चेतन व्हनगुंटी, वाहनचालक रशीद शेख व संजय नवले यांच्या पथकाने पार पाडली.

वारीच्या अनुषंगाने सहा पथके तयारराज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरात हातभट्टी दारु ठिकाणे, धाबे हॉटेलवर छापे टाकण्यात येत आहेत. आषाढी वारीच्या अनुषंगाने सहा पथके तयार करण्यात आली आहेत. पालखी मार्गावरील तसेच पंढरपूर शहर परिसरातील अवैध दारू ठिकाणांवर कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी परिसरातील अवैध दारूधंद्याची माहिती द्यावी असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी केले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी