शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
3
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
4
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
5
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
6
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
8
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
9
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
10
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
11
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
12
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
14
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
15
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
16
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
18
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
19
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
20
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?

सोलापूरातील यंत्रमाग कारखानदारांचा बंद, अठरा दिवसांत ७० कोटींचा फटका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 3:32 PM

सोलापूर दि २५ : ईपीएफच्या विरोधात यंत्रमागधारकांनी पुकारलेल्या बेमुदत बंदमुळे मागील अठरा दिवसांत चादर आणि टॉवेल निर्मितीच्या उद्योगाला ७० कोटींचा फटका बसला आहे.

ठळक मुद्देगेल्या ४५ वर्षांत तब्बल सात वेळा विविध मागण्यांसाठी संप करण्यात आलाया उद्योगाची वार्षिक उलाढाल साधारण १५०० कोटी रुपयांच्या आसपासमालक संघटनेच्या वतीने १८ दिवसांचा बंद पहिल्यांदाच

महेश कुलकर्णीसोलापूर दि २५ : ईपीएफच्या विरोधात यंत्रमागधारकांनी पुकारलेल्या बेमुदत बंदमुळे मागील अठरा दिवसांत चादर आणि टॉवेल निर्मितीच्या उद्योगाला ७० कोटींचा फटका बसला आहे. कामगार आणि मालक यांच्यातील संघर्ष पहिल्यांदाच नसून गेल्या ४५ वर्षांत तब्बल सात वेळा विविध मागण्यांसाठी संप करण्यात आला आहे.वेगवेगळे युनिट क्लब करून त्यांना ईपीएफ लागू करण्याचा निर्णय भविष्य निर्वाह निधी आयुक्त डॉ. हेमंत तिरपुडे यांनी जुलैअखेरीस दिला. या निर्णयाला यंत्रमाग कारखानदारांनी जोरदार विरोध केला. आॅगस्टमध्ये सहा दिवस आणि आॅक्टोबरमध्ये अठरा दिवस असा एकूण २४ दिवस हा उद्योग बंद ठेवला. ७ आॅक्टोबरपासून सुरू झालेला हा संप दिवाळी संपून गेली तरीही सुरू असून, यावर तोडगा अद्याप न निघाल्याने चादर आणि टॉवेल निर्मिती करणाºया उद्योगाला गेल्या अठरा दिवसांत सुमारे ७० कोटींचा फटका बसला आहे. दररोज साधारण ४ कोटींची उलाढाल असणाºया या उद्योगाची वार्षिक उलाढाल साधारण १५०० कोटी रुपयांच्या आसपास आहे. आखाती देश, जर्मनी, उत्तर अमेरिका, श्रीलंका, नेपाळ या देशांमध्ये सोलापुरी टॉवेलची मोठ्या प्रमाणात निर्यात होत असते. येथे तयार होणाºया मालापैकी ४०% माल हा परदेशात निर्यात तर उर्वरित मालाला इतर राज्यातून मागणी असते. चादर बनविणारे साधारणत: १५० ते २०० कारखाने आहेत तर टॉवेल बनविणारे ६५० ते ७०० कारखाने येथे चालतात. साधारण ४५ हजार कामगार या उद्योगात काम करतात.गेले अठरा दिवस हा उद्योग पूर्णपणे बंद आहे. हा काही पहिलाच संप नाही. या आधीही असे अनेक संप झाले आहेत. काही वेळा कामगार संघटनांच्या मागण्यांसाठी तर काही वेळा कारखानदारांच्या मागण्यांसाठी बंद झालेले आहेत. परंतु मालक संघटनेच्या वतीने १८ दिवसांचा बंद पहिल्यांदाच झाला आहे. १९७२ साली यंत्रमाग कामगारांनी पहिल्यांदा  बंद पुकारला. कामगारांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेला हा संप                  २३ दिवस चालला. यानंतर ८४ साली असाच कामगारांनी संप पुकारला. तो ५३ दिवस चालला. यानंतर आतापर्यंत सुमारे सात वेळा मोठे संप झाले. ------------------------ १९७२ - २३ दिवस (कामगारांच्या मागण्या)- १९८० - ८ दिवस (कामगारांच्या मागण्या)- १९८२ - पाच दिवस (कामगारांच्या मागण्या)- १९८४ - ५३ दिवस (किमान वेतनाची मागणी)- १९९३ - दोन दिवस (कामगारांच्या मागण्या)- २०१३ - दोन दिवस बंद (कामगार कल्याण मंडळाला कारखानदारांचा विरोध)- २०१७ - २४ दिवस बंद (कारखानदारांचा ईपीएफला विरोध)