Solapur Flood; पंढरपुरातील घाटाच्या कामासाठी पुण्यात अजित पवार घेणार बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 04:43 PM2020-10-17T16:43:47+5:302020-10-17T16:43:53+5:30
दोषींवर कारवाईसाठी मी वैयक्तिक लक्ष देणार : उपमुख्यमंत्री
पंढरपूर : पंढरपुरातील चंद्रभागा नदीपात्राजवळ नव्याने बांधण्यात आलेला घाटाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू आहे. या कामासाठी पुण्यामध्ये बैठक घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
चंद्रभागा नदीच्या तीरावर असलेल्या कुंभार घाटा शेजारील नवीन बांधण्यात आलेल्या घाट कोसळला. या घाटाच्या भरावा खाली दबुन सहा जणांचा मृत्यू झाला होता. ह्या घटनेच्या स्थळी भेट देण्यासाठी व पंढरपुरात पुरामुळे झालेल्या माहिती घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारपंढरपूरला आले होते. यावेळी त्यांनी अधिकाºयांना सूचना दिल्या. यावेळी आ. भारत भालके, प्रांत अधिकारी सचिन ढोले, मुख्याधिकारी अनिकेत मनोरकर, गट विकास अधिकारी रविकिरण घोडके, जलसंपदा विभागाचे अधिकारी जयंत शिंदे, रावसाहेब मोरे उपस्थित होते.
पुढे पवार म्हणाले, घाटाच्या कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट दिसत आहे. घाटाच्या कामात काळी माती दिसत आहे. याकडे अधिकाºयांनी दुर्लक्ष केले आहे. घाट कोसळून सहाजणांचा मृत्यू झाला. या प्रकरणात ठेकेदार व अधिकाºयांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा. घाटाच्या कामाची माहिती घेण्यासाठी पुण्यामध्ये बैठक घेणार आहे. या बैठकीला पंढरपुरातील अधिकारी व आ. भारत भालके उपस्थित राहतील. या प्रकरणातील दोषीं वर कारवाईसाठी मी वैयक्तिक लक्ष देणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
केंद्राचे पथक लवकर पाठवा
कोरोना प्रमाणे पुराचे संकट देखील मोठे आहे. पुरात बाधीत झालेल्या लोकांचे व शेतकºयांचे तात्काळ पंचनामे होणे गरजेचे आहे. यासाठी केंद्र शासनाचे पथक पाहणी करत असते. त्या पथकाला तात्काळ पुराची पाहणी करावी अशी विनंती करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.