- विलास जळकोटकर सोलापूर : निवडणुक आयोगाच्या सूचनेनुसार विशेष पूर्ननिरीक्षण मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नेमणूक केलेल्या १८ जणांविरुद्ध नायब तहसीलदारांनी दिलेल्या तक्रारीनुसार सदर बझार पोलीस ठाण्यात कर्तव्यात कसूर केल्याबद्दल लोकप्रतिनिधी अधिनियमाचे कलम ३२ प्रमाणे गुन्हा नोंदला आहे. यामध्ये चार शिक्षक, आठ शिक्षिका, चार लिपिक आणि दोन मुख्याध्यापकांचा समावेश आहे.
याबाबत उत्तर तहसिल कार्यालयातील नायब तहसिलदार सुधाकर तुकाराम बंडगर (वय ४९) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किरण गंगाधर जोशी (सह शिक्षक), प्रमोदिनी खजुरकर (सह शिक्षिका, सेवासदन प्रशाला), बी.सी. पटणे (लिपीक, म.न.पा. झोन क्र.४), अर्चना गुजरे (सह शिक्षिका- न.मु.वि. शाळा), एस.ए. हंचाटे (सहशिक्षक, त्र्यंबकेश्वर विद्यालय ), आर.एस. अंकुश (लिपीक, झोन क्र ७), बी.टी. गायकवाड (शिक्षिका म.न.पा), एस.आर. चौधरी (शिक्षिका, म.न.पा), जे. एम. कांबळे (शिक्षिका, अंगणवाडी ), एस.एन. बिराजदार (सहशिक्षिका सरस्वती तिमप्पा प्रशाला ), एस.डी. शिंदे (लिपीक- म.न.पा), एस. जे. मनियार (लिपीक म.न.पा.), आर.एम. म्हमाणे (सहशिक्षिका- सोनामाता आदर्श कन्या विद्यालय), ए. के. आरगडे (सहशिक्षिका, सिद्धेश्वर प्रशाला), संदीप पाटील (सहशिक्षक संभाजीराव शिंदे प्रशाला ), टी.एम. पवार (सहशिक्षक, शहा कोठारी प्रशाला), शारदा दिगंबर मस्के (मुख्याध्यापक त्र्यंबकेश्वर विद्यालय), युवराज मेठे (मुख्याध्यापक, कुचन प्रशाला) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी फौजदार डोंगरे तपास करीत आहेत.